शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माँ जगदंबा प्लॉट खरेदी-विक्री केंद्राला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:07 IST

नागपूर : पांजरा येथील माँ जगदंबा प्लॉट खरेदी-विक्री केंद्राचे राजेश चिंचुलकर यांना अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची चपराक ...

नागपूर : पांजरा येथील माँ जगदंबा प्लॉट खरेदी-विक्री केंद्राचे राजेश चिंचुलकर यांना अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची चपराक बसली. वानाडोंगरीतील तक्रारकर्ते ग्राहक पुरुषोत्तम पडोळे यांचे ६० हजार २०० रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश आयोगाने चिंचुलकर यांना दिला. तसेच, पडोळे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम चिंचुलकर यांनीच द्यायची आहे.

व्याज ४ जानेवारी २००७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी चिंचुलकर यांना ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. पडोळे यांच्या तक्रारीवर आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. तक्रारीनुसार, पडोळे यांनी चिंचुलकर यांच्याकडून मौजा गुजरखेडी येथील पाच भूखंड १ लाख ६४ हजार ४१५ रुपयात खरेदी करण्यासाठी करार केले व चिंचुलकर यांना तीन विविध तारखांना एकूण ६० हजार २०० रुपये अदा केले. चिंचुलकर ३१ जानेवारी २००७ पर्यंत भूखंडांचे विक्रीपत्र करून देणार होते. ती मुदत संपल्‍यानंतर पडोळे यांनी विक्रीपत्र करण्याची व भूखंडांचा ताबा देण्‍याची मागणी केली. परंतु, चिंचुलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. परिणामी, पडोळे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्यात चिंचुलकर यांनी लेखी उत्तर दाखल करून तक्रारीतील सर्व आरोप अमान्य केले व तक्रार खारीज करण्याची आयोगाला विनंती केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता सदर निर्णय दिला.

--------------

भूखंडांपासून वंचित ठेवले

चिंचुलकर हे पडोळे यांच्याकडून स्वीकारलेली रक्कम १९९९ पासून वापरत आहेत. याशिवाय त्यांनी पडोळे यांना भूखंडांच्या उपभोगापासून वंचित ठेवले आहे. चिंचुलकर यांच्या अशा वागण्‍यामुळे पडोळे यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला तसेच आयोगात तक्रार दाखल करावी लागली. चिंचुलकर यांनी पडोळे यांच्यासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला व सेवेत त्रुटी ठेवली, असे मत आयोगाने निर्णयात नोंदवले.