शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला ७२० टक्क्यांच्या ‘प्रॉफिट’चे आमिष, आरोपींकडून ७.४३ लाखांचा गंडा

By योगेश पांडे | Updated: October 10, 2023 00:33 IST

क्रिप्टो करंसीच्या नावाखाली फसवणुकीचे रॅकेट

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: वर्षाला ७२० टक्क्यांच्या ‘प्रॉफिट’चे आमिष दाखवत नाशिक-बुलडाण्याच्या टोळीने फसवणुकीचे रॅकेट रचले व नागपुरातील दोन तरुणांना जाळ्यात ओढले. क्रिप्टो करंसीत गुंतवणूकीच्या नावाखाली त्यांनी आरोपींना ७.४३ लाखांचा गंडा घातला. या टोळीने नागपुरातील इतरही लोकांना असे फसवले असल्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

उमेश गणपतराव कडू (२९,वसंतनगर, जुना बाबुळखेडा) व राहुल चिलकुलवार असे फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना राजेंद्र उपाध्याय (नाशिक) व गोपालसिंह तोमर (खामगाव, बुलडाणा) यांनी संपर्क केला व त्यांची प्लॅटीन वर्ल्ड नावाची कंपनी असल्याची बतावणी केली. आमची कंपनी क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक करते व त्यातून खूप फायदा होतो. जर आमच्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक केली तर दिवसाला २ टक्के, महिन्याला ६० टक्के व वर्षाला ७२० टक्के नफा मिळेल, असा दावा त्यांनी केला. त्यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पॉईंट येथे उमेशची भेट घेतली.

उमेशला त्यांच्यावर विश्वास घेतला व त्याने राहुलसोबत ७.४३ लाखांची रक्कम गुंतवली. मात्र आरोपींनी त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. उमेशने त्यांना रक्कम परत मागितली असता आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर उमेशने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी