शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्सिस बँकेत नोकरीचे आमिष : महिलेची फसवणूक, ९२ हजार हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 21:08 IST

अ‍ॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित महिलेची सायबर गँगने फसवणूक केली. अनामिका शर्मा, दीपक कुमार आणि अभिषेक शर्मा अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे असून ते सर्व गुडगाव (हरियाणा) येथील रहिवासी आहेत.

ठळक मुद्दे नागपुरातील प्रतापनगर ठाण्यात  गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित महिलेची सायबर गँगने फसवणूक केली. अनामिका शर्मा, दीपक कुमार आणि अभिषेक शर्मा अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे असून ते सर्व गुडगाव (हरियाणा) येथील रहिवासी आहेत.अश्विनी अरुण बुराडे (वय ३२) या वर्धा मार्गावरील जुने स्रेहनगर येथे राहतात. ३ मे रोजी दुपारी १२. ३० च्या सुमारास त्यांना उपरोक्त आरोपींनी संपर्क केला. तुम्ही राहात असलेल्या शहरात अ‍ॅक्सिस बँकेत व्यवस्थापकाची जागा रिक्त आहे, असे सांगून आरोपींनी अश्विनी यांना ती नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी अश्विनी यांना अर्ज करण्यासाठी ४ हजार रुपये आणि व्हेरिफिकेशनच्या नावावर नंतर १० हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा करायला सांगितले. त्या नंतर २३ मे पर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या नावाखाली अश्विनी यांच्याकडून ९२ हजार रुपये कॅनरा बँकेच्या गुडगाव शाखेतील आपल्या खात्यात जमा करून घेतले. एवढी रक्कम घेतल्यानंतरही प्रत्येक वेळी काही ना काही सबब सांगून आरोपी अश्विनी यांना रक्कम जमा करण्यास सांगत होते. त्यामुळे अश्विनी यांना संशय आला. त्यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्याने अश्विनी यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचे कलम ४२० भादंवि तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आरोपींचा शोध घेतला जात आहे.अनेकांची फसवणूकदिल्ली, नोएडात बसलेले गुन्हेगार तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अशा प्रकारे रोजच अनेकांची फसवणूक करतात. तसे गुन्हेही देशभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होतात. मात्र, या ठगबाजांना अटक करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. ते गरीब व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून बँकेत खाते उघडतात आणि फसवणूक केलेल्यांची रक्कम खात्यात जमा होताच एटीएमने काढून घेतात.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी