शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
7
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
8
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
9
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
10
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
11
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
12
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
13
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
14
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
15
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
16
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
17
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
18
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
19
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
20
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!

प्रेमी युगुल विहिरीत बुडाले

By admin | Updated: October 26, 2015 02:42 IST

दारूच्या नशेत टुन्न झालेल्या मैत्रिणीने विहिरीत उडी मारली. सोबत तिने मित्राचाही हात पकडला.

दारूच्या नशेतील मैत्रिणीने केला घात : कळमन्यातील घटनानागपूर : दारूच्या नशेत टुन्न झालेल्या मैत्रिणीने विहिरीत उडी मारली. सोबत तिने मित्राचाही हात पकडला. त्या मित्राने आपल्या मित्राचा हात पकडला. त्यामुळे तिघेही खोल विहिरीत बुडाले. नशीब बलवत्तर म्हणून एकाचा जीव वाचला. दोघे मात्र गतप्राण झाले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. कापसी उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या धारगाव शिवारात वालदे यांचे शेत आहे. नंदनवनच्या चिटणीसनगरात राहाणारा कुणाल प्रभाकर बिजवे (वय २५), इम्रान खान (वय अंदाजे २५) आणि त्याची मैत्रिण प्रिया (वय अंदाजे २५) हे तिघे ‘पार्टी’साठी रविवारी दुपारी ४ च्या सुमारास धारगाव शिवारात गेले. तेथे तिघेही यथेच्च दारू पिले. त्यानंतर हे तिघेही वालदेच्या शेतातील विहिरीच्या काठावर बसले. विहिरीत पाय टाकून बसलेल्या प्रियाची एकूणच देहबोली लक्षात आल्यामुळे कुणाल उठून उभा झाला. तो इम्रानच्या बाजूला उभा होता. नशेत डोलणाऱ्या प्रियाने अचानक पाण्यात उडी घेतली. यावेळी तिने इम्रानचा हात पकडला. त्यामुळे तिच्यासोबतच इम्रानही पाण्यात पडला. मात्र, विहिरीत पडण्यापूर्वी इम्रानने कुणालचा हात पकडल्याने या दोघांसोबत कुणालही विहिरीत पडला. तिघेही दारूच्या नशेत तर्र होते. त्यांना पोहणेही येत नव्हते. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. काहीसा हुशारीत असलेल्या कुणालने विहिरीचा काठ घट्ट पकडून ठेवल्यामुळे तो पाण्यावर राहिला. प्रिया आणि इम्रान त्याच्या डोळ्यादेखत बुडाले. (प्रतिनिधी)पोलिसांनी वाचविला जीवधारगाव शिवारात गुन्हेगार आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांची सारखी वर्दळ असते. त्यामुळे या भागात पोलीसही अलीकडे गस्त घालू लागले आहेत. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास कळमना पोलीस गस्त घालत असताना त्यांना विहिरीतून बचाव बचाव असा आवाज आला. त्यामुळे एएसआय आनंद राव आणि शिपाई राहूल इंगोले तिकडे धावले. विहिरीत कुणाल आढळला. त्याला पोलिसांनी बाहेर काढले. नंतर त्याच्या पोटातील पाणी काढून त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यामुळे कुणालचा जीव वाचला.रात्री निघाला मृतदेहया घटनेचे वृत्त कळताच परिसरात खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी धावले. कळमन्याचे पीएसआय राम मोहिते, पीएसआय राऊत आपल्या ताफ्यासह पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवून घेतले. अथक प्रयत्नानंतर रात्री ८ नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रियाचा मृतदेह बाहेर काढला. इम्रानचा मृतदेह विहिरीतून काढण्याचे प्रयत्न सुरू होते.