शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने प्रेयसीसमोर लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:02 IST

हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा मैल येथे एका प्रियकराने प्रेयसीसमोर गळफास लावून मृत्यूला कवटाळले.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या चौदामैल येथील घटना : तिचे प्रयत्न अपुरे ठरले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (कळमेश्वर ) : हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा मैल येथे एका प्रियकराने प्रेयसीसमोर गळफास लावून मृत्यूला कवटाळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रणय देवीदास मोरे (२६). रा.वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. दोन दिवसावर व्हॅलेंटाईन डे आला असताना बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.प्राप्त माहितीनुसार प्रणय हा भाड्याने चौदामैल येथे सुनील बोरकर यांच्या घरी राहत होता. तो चौदामैल येथील उडान कंपनी येथे कार्यरत होता. त्याची प्रेयसी ही सुद्धा वर्धा येथील राहणारी आहे. ती लखनौ, उत्तर प्रदेश येथे गेली होती. तिला फोन करून त्याने बुधवारी चौदामैल येथील रूमवर बोलावले होते. गत दोन वर्षांपासून हे प्रेमप्रकरण सुरू होते. परंतु प्रणय हा तिच्यावर संशय घेत होता. बुधवारी त्याने तिला इतरांशी बोलण्यास मनाई केली. याच विषयावर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने मृताने तिच्यासमोर तार गळ्याला बांधून फॅनला लटकला. यावेळी तिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची शक्ती कमी पडली. तिने आरडाओरडसुद्धा केली. परंतु प्रणयचे राहणे तिसऱ्या माळ्यावर असल्याने घरमालकीण व नागरिक येईपर्यंत त्याने फाशी लावली होती. त्यानंतर त्या युवतीने मृताच्या कंपनीत फोन लावून ही माहिती दिली. कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रणयला ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात एएसआय निरंजन गवई, पोलीस हवालदार प्रकाश उईके, पवन वाघमारे करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याValentine Weekव्हॅलेंटाईन वीक