शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ‘पीटीएस’मधील प्रेमलीला विशेष शाखेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:33 IST

पोलीस प्रशिक्षण केंद्रात रंगलेल्या प्रेमलीलेची चौकशी आता विशेष शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, ‘भरोसा सेल’कडूनही या प्रेमलीलेवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस प्रशिक्षण केंद्रात रंगलेल्या प्रेमलीलेची चौकशी आता विशेष शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, ‘भरोसा सेल’कडूनही या प्रेमलीलेवर समुपदेशनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचारी महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तिने स्वत:सोबत दुसऱ्याच महिलेच्या पतीला आपला पती असल्याचे सांगून पोलीस प्रशिक्षण केंद्रात (पीटीएस) क्वारंटाईन करून घेतल्याचे उघड झाले. या प्रकरणातील दोन बायकांचा दादला बनू पाहणाऱ्या व्यक्तीची पत्नी थेट बजाजनगर पोलीस ठाण्यात पोहचली आणि तिने आपल्या पतीला 'तिच्या' तावडीतून सोडवा, अशी तक्रार नोंदवली. त्यामुळे हे प्रकरण पोलीस दलात चर्चेला आले. दरम्यान, संबंधित व्यक्तीला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या क्वारंटाईन सेंटरमधून काढून व्हीएनआयटीत पाठविण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी याप्रकरणाची चौकशी विशेष शाखेकडे सोपवली. त्यामुळे विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी बजाज नगर पोलिसांकडून प्राथमिक चौकशीची कागदपत्रे मागून घेतली आहे. या पार्श्वभूमीमुळे विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता या नाजूक प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.उससे मेरे पती को बचाओपती तिच्या नादी लागला असला तरी आपल्याला आपल्या पतीसोबतच राहायचे आहे, असे पीडित महिलेने सांगितले आहे. उससे मेरे पती को बचाओ, अशीही तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी तिच्या पतीवर हक्क सांगणाऱ्या महिलेसह संबंधित पुरुषांचेही कौन्सिलिंग करण्याची जबाबदारी भरोसा शाखेला सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर आता भरोसा सेलही पुढे आले आहे.अद्याप गाठभेट नाही !दुसऱ्या महिलेच्या पतीला आपला पती असल्याचे सांगणारी विजेता सध्या क्वारंटाईन आहे. त्यामुळे तिच्याशी आपली अद्याप भेट झालेली नाही. दोन दिवसानंतर तिला सुटी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिची भेट घेऊन तिचे समुपदेशन करण्यात येईल, अशी माहिती भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शुभदा संख्ये यांनी दिली.एकदा धुलाईही झालीया प्रकरणात खलनायिका म्हणून उजेडात आलेली महिला पोलीस कर्मचारी यापूर्वीही अनेकदा चर्चेत आली आहे. तर अशाच प्रकरणात विशेष शाखेची, पाचपावली आणि सीताबर्डीतील महिला शिपाई देखील चर्चेत आली होती. एकीची नियंत्रण कक्षासमोर पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने एकदा जबरदस्त धुलाईही केली होती, हा किस्साही आता चर्चेला आला आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस