शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘सोशल मीडिया’ने विवाहित महिला पोहोचली कुटुंबीयांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:26 IST

कोल्हापुरातील घरापासून दुरावलेल्या महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुखरूप घरी पोहचविल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील पाटनसावंगी येथे घडली. 

ठळक मुद्देकोल्हापुरातील महिला नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीत गवसली‘लाईव्ह व्हिडिओ’ने अर्ध्या तासात ओळख पटलीसामाजिक कार्यकर्त्याचा महत्त्वाचा हातभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोल्हापुरातील घरापासून दुरावलेल्या महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुखरूप घरी पोहचविल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील पाटनसावंगी येथे घडली. मध्यरात्रीनंतर साधारणत: १ वाजताच्या सुमारास एकटी महिला पायी जात असल्याचे लक्षात येताच एका तरुणाने सामाजिक कार्यकर्त्याला ही बाब सांगितली. त्यामुळे त्याने तडक घटनास्थळ गाठले. त्या महिलेची विचारपूस करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा ‘लाईव्ह व्हिडिओ’ केला. पाहतापाहता त्यावर अनेकांचे संदेश आले आणि ती महिला एकाच्या ओळखीची निघाली. त्याने ही बाब सदर महिलेच्या कुटुंबापर्यंत पोहोचविली. त्यांनीही लगेच पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सदर महिलेला कुटुंबाच्या सुपूर्द केले. एखाद्या चित्रपटातील कथानक वाटावे, अशी ही घटना आहे. ही घटना पाटणसावंगी येथे बुधवारी (दि. १६)मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुरुवारी (दि. १७) तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.छाया यशवंत कांबळे (३८, रा. नवीन वसाहत औखाड, जि. कोल्हापूर) असे सदर महिलेचे नाव आहे. कौटुंबिक कारणामुळे छाया ही कोल्हापुरातून तडक नागपुरात पोहोचली. नागपुरातून पुढे ती दहेगाव (रंगारी)पर्यंत गेली. मात्र तिच्याकडील पैसे संपले. आता पुढचा प्रवास कसा करावा, थांबावे कुठे असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे ती दहेगावपासून चालत राहिली. मध्यरात्रीनंतर साधारणत: १ वाजताच्या सुमारास ती हितेश नंदकुमार बन्सोड, रा. सावनेर याच्या फेसबुक मित्राला ती पाटणसावंगीच्या वाकी जोडरस्त्यावर दिसली. हितेश हा मनोरुग्ण व निराधारांचा आधारवड म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला ही माहिती मिळताच त्याने थेट पाटणसावंगी गाठले. मित्राने सांगितलेल्या वर्णनानुसार तो छायापर्यंत पोहोचला. तिची विचारपूस केली असता तिने छाया हे नाव सांगत सांगलीला माहेर असल्याचे सांगितले. त्यामुळे हितेशने क्षणाचाही विलंब न लावता ‘फेसबुक लाईव्ह’ केले. दरम्यान मुस्ताफा विनोद पाटील, शैलेश शिंदे यांनी सदर महिलेला ओळखत असल्याचे सांगितले. तर मुस्तफा मुजावर याने छायाच्या कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्याने पूर्ण माहिती घेऊन छाया ही नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीपर्यंत पोहोचली असल्याचेही सांगितले. त्याने मोबाईल क्रमांक सांगून छायाच्या कुटुंबीयांशी हितेशचे बोलणेही करून दिले. ‘छायाची काळजी घ्या, आम्ही येतोच’ असे तिच्या कुटुंबीयांनी विनवणी केली. त्यानुसार गुरुवारी तिचा पती यशवंत वसंत कांबळे, आई शेवंता, जाऊ राणी कांबळे हे सर्व सावनेर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर छायाला त्यांच्या सुपूर्द केले.निराधारांचा आधारवडसावनेर परिसरात निराधार, मनोरुग्णांचा आधारवड म्हणून हितेश बन्सोड या तरुणाकडे बघितले जाते. आतापर्यंत त्याने २५ पेक्षा जास्त मनोरुग्णांची सेवा केली. त्यांची अंघोळ, दाढी आदी कामांसोबतच चांगले कपडे, जेवण देऊन तो त्यांना नागपुरातील मनोरुग्णालयात तर निराधारांना वृद्धांना वृद्धाश्रमात दाखल करतो. आतातर सावनेर परिसरात कुणीही अनोळखी, भटकंती करणारी व्यक्ती दिसल्यास हितेशचीच आधी आठवण केली जाते. पाटणसावंगी येथे आढळलेली छायाच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. निराधारांच्या मदतीला धावतो ही बाब त्याच्या फेसबुक मित्रांना माहीत आहे. सदर महिला पाटणसावंगीत दिसताच त्याचे फेसबुक मित्र केदार आंबोलकर, गौरव कोल्हटकर यांनी हितेशला सांगितले. त्यामुळेच ती महिला सुखरुप तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकली. या कामात सावनेर पोलिसांनीही सहकार्य केले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया