शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘शेड्युल’ ठरत नसल्यामुळे एसटीला तोटा; बसेस तयार पण मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:59 IST

Nagpur News लॉकडाऊनमध्ये बसेसच्या वाहतुकीवर बंदी नाही. परंतु प्रवासीच मिळत नसल्यामुळे ५० टक्के बसेस आगारातच उभ्या राहत आहेत. बदललेल्या निर्देशामुळे एसटी बसेसचे नियोजन होत नसल्यामुळे एसटीला तोटा होत आहे.

वसीम कुरेशी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षी दीर्घकाळ लॉकडाऊनचा सामना केल्यानंतर नव्या वर्षातही पुन्हा मार्च महिन्यात एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये बसेसच्या वाहतुकीवर बंदी नाही. परंतु प्रवासीच मिळत नसल्यामुळे ५० टक्के बसेस आगारातच उभ्या राहत आहेत. बदललेल्या निर्देशामुळे एसटी बसेसचे नियोजन होत नसल्यामुळे एसटीला तोटा होत आहे.

दुसऱ्यांदा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात ४०० पैकी २२० बसेस धावत आहेत. एकूण १.४० लाख किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर एसटीला ४२ लाखाचे उत्पन्न मिळत होते. परंतु आता २२० बसेस धावत असल्यामुळे एसटीच्या बसेस केवळ ८० हजार किलोमीटर धावत आहेत. त्यामुळे ४२ लाखाचे उत्पन्न १७ ते १८ लाखावर आले आहे. डिझेलचे दरही वाढले असून पासधारकांची संख्या कमी झाली आहे. एका बसमध्ये २२ प्रवासी बसविल्यामुळे तोटा होतो. भाजीपाला विकणाऱ्यांसह लहान व्यवसाय करणारे लॉकडाऊनमध्ये प्रवास करीत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे ऐनवेळी एसटीचे शेड्युल रद्द करण्यात येत आहे.

रद्द कराव्या लागत आहे फेऱ्या

‘आगारात एसटीच्या बसेस तयार ठेवण्यात येत आहेत. परंतु प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. कोणत्या मार्गावर किती प्रवासी मिळतील, हे ठरत नाही. प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे काही फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.’

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

.............

टॅग्स :state transportएसटी