शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळ तोट्यात : 'शिवशाही', 'ब्रिक्स'वर लागू शकतो नवीन वर्षात विराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:06 IST

महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळात (एसटी) शिवशाही बसेस आणि अन्य बसेसची धुलाई करणारी कंत्राटदार कंपनी ‘ब्रिक्स’च्या कंत्राटावार नवीन वर्षात विराम लागू शकतो.

ठळक मुद्देकराव्यात नवीन उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळात (एसटी) शिवशाही बसेस आणि अन्य बसेसची धुलाई करणारी कंत्राटदार कंपनी ‘ब्रिक्स’च्या कंत्राटावार नवीन वर्षात विराम लागू शकतो. शिवशाही बस आणि ब्रिक्स कंपनी आल्यानंतर महामंडळाला तोटा होत असल्याची माहिती आहे. याशिवाय अ‍ॅल्युमिनियम बॉडीच्या बसेसला लोखंडी बॉडीमध्ये परावर्तित करण्याचेही कारण सांगितले जात आहे.सन २०१७ मध्ये बसेसच्या धुलाईसाठी मुख्यालय स्तरावर ४४६.९ कोटी रुपयांचे धुलाई आणि सफाईचे कंत्राट तीन वर्षांसाठी ब्रिक्स कंपनीला देण्यात आले. दोन वर्षांत कंपनीला जवळपास ५ कोटींचे भुगतान करण्यात आले आहे. नागपूर विभागाने मार्च २०१८ ते २०१९ पर्यंत ३ कोटी ५१ लाख २७ हजार रुपयांचे भुगतान ब्रिक्सला केले आहे. गणेशपेठ एसटी स्थानकावर पूर्वीपासूनच बस वॉशिंग प्रकल्प आहे. त्याच्या बाजूलाच ब्रिक्स कंपनीचे कर्मचारी हाय प्रेशर जेटने पाणीचा फवारा मारुन बसेस धुतात. महामंडळाकडे बसमध्ये डिझेल भरण्यासाठी आधीच पैसे नाहीत, मग कंपनीला कोट्यवधींचे भुगतान करण्यासाठी व्यवस्था कुठून करण्यात आली, हा गंभीर प्रश्न आहे.सन २०१७ मध्ये शिवशाही बसेस सुरू झाल्या. नागपूर विभागात २७ शिवशाही बसेस करारावर धावत आहेत. याकरिता एएसटी महामंडळ १९ रुपये प्रति किमी हिशोबाने किराया अदा करते. हा हिशोब महामंडळासाठी तोट्याचा सौदा ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० कोटीऐवजी कर्मचाऱ्यांच्या पोषाखाच्या ७३ कोटींच्या कंत्राटातूनही महामंडळाला फायदा झाला नाही. महाग पोषाख अनेक कर्मचाऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचले नाहीत आणि फिटिंगबाबतही अनेक तक्रारी आहेत. याशिवाय बसेसला जास्त सुरक्षित बनविण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम बॉडीला स्टील बॉडीमध्ये परावर्तित करण्याचा भार महामंडळाच्या खजिन्यावर पडला आहे. यादरम्यान आता परिवहन मंत्रालयाची जबाबदारी दुसऱ्याच्या हातात सोपविण्याची येणार असल्याची माहिती आहे.गेल्या दोन वर्षांत करण्यात आलेल्या कवायतींमुळे एसटीला फायदा कमी आणि नुकसान जास्त झाले आहे. तर दुसरीकडे अधिकारी स्तरावर सुट्ट्यांचा क्रम सुरूच आहे. कार्यालयांमध्ये कंत्राटावरील कर्मचारी मोठ्या संख्येने दिसत आहे, त्यानंतरही एसटीला मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत नाही. अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे उपाययोजना आहेत, पण ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यास धजावट नाहीत. त्यामुळे महामंडळाला हवा तसा फायदा होताना दिसत नाही. अशावेळी कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सूचना वरिष्ठांनी ऐकून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी