शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाच्या परिवहन विभागाला ६४ कोटींचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:46 IST

महापालिकेच्या परिवहन विभागाचा२०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन विभागाचे व्यवस्थापक मंगळवारी परिवहन समितीला सादर करणार आहेत.२०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २५४.५६ कोटींचा होता तर सुधारित अर्थसंकल्प २१७.०९ कोटींचा होता. गेल्या वर्षात परिवहन विभागाचा खर्च १२२ कोटींचा असून, उत्पन्न ५८.१७ कोटींचे आहे. विभागाला ६४ कोटींचा तोटा झाला आहे.

ठळक मुद्देआज अर्थसंकल्प : गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक तरतूद : प्रवासी वाढण्यासाठी विविध योजना

लोकमत न्यूज नेटवकंनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाचा२०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन विभागाचे व्यवस्थापक मंगळवारी परिवहन समितीला सादर करणार आहेत.२०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २५४.५६ कोटींचा होता तर सुधारित अर्थसंकल्प २१७.०९ कोटींचा होता. गेल्या वर्षात परिवहन विभागाचा खर्च १२२ कोटींचा असून, उत्पन्न ५८.१७ कोटींचे आहे. विभागाला ६४ कोटींचा तोटा झाला आहे.स्थायी समितीच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यानंतर स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात याचा स्वतंत्र समावेश केला जाणार आहे. परिवहन समितीला स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतरचा समितीचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. शहर बसची प्रवासीसंख्या वाढावी, यासाठी विविध योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. परिवहन समितीच्या बैठकीत सभापती बंटी कुकडे यांना व्यवस्थापक शिवाजी जगताप अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे अधिकार परिवहन समितीला आहे.वंश निमय यांचा कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर महापालिकेने शहर बससेवा चालविण्यासाठी पाच आॅपरेटरची नियुक्ती के ली आहे. रेड बसची जबाबदारी तीन आॅपरेटरवर तर ग्रीन बससाठी स्वतंत्र आॅपरेटची नियुक्ती केली आहे. तसेच या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाचवा आॅपरेटर नियुक्त करण्यात आला आहे.एप्रिल २०१७ पासून शहर बससेवेची जबाबदारी रेड बसच्या तीन आॅपरेटवर सोपविण्यात आली. सुरुवातीला काही महिने २४० बसेस शहरात धावत होत्या. टप्प्याटप्प्याने बससंख्या वाढविण्यात आली. आता ही संख्या ३८० झाली आहे. बससंख्या वाढली परंतु यासोबतच तोटाही वाढला आहे.ग्रीन बसला प्रतिसाद वाढलामहापालिकेला परिवहन सेवा तोट्यात चालवावी लागत आहे. ग्रीन बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी ६ एप्रिलपासून भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रीन बसच्या प्रवाशात १४ टक्के वाढ झाली आहे. एप्रिलपर्यंत दर महिन्याला ग्रीन बसमधून ५० हजार प्र्रवासी प्रवास करीत होते. आता ही संख्या ७० हजारांवर गेली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक