शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीचा घटतोय साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 10:31 IST

प्रदूषण व अवैध वाळू उपस्यासह इतर कारणामुळे कन्हान नदीचा जलसाठा कमी झाला आहे. उपयुक्त उपाययोजना करून कन्हान नदीला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे अन्यथा कन्हान नगर परिषदद्वारे साकारण्यात येणारी १८ कोटी ९८ लाखांची जलशुद्धीकरण योजना निकामी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रदूषण व अवैध वाळू उपसाप्रशासन कधी घेणार दखल?

धनंजय कापसीकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रदूषण व अवैध वाळू उपस्यासह इतर कारणामुळे कन्हान नदीचा जलसाठा कमी झाला आहे. उपयुक्त उपाययोजना करून कन्हान नदीला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे अन्यथा कन्हान नगर परिषदद्वारे साकारण्यात येणारी १८ कोटी ९८ लाखांची जलशुद्धीकरण योजना निकामी होण्याची शक्यता आहे. कन्हान नदी वैनगंगेला संगम करणाऱ्या प्रमुख सहायक नद्यापैकी एक आहे. नागपूर शहर व लगतच्या गावांना पाणीपुरवठा याच नदीद्वारे केला जातो. परंतु वर्तमानकाळात नदीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतो आहे. कारण अप्रत्यक्ष पाणीस्रोत असणाऱ्या पेंच प्रकल्पसुद्धा मध्य प्रदेशातील चौराई डॅममुळे कोरडा पडत आहे तर कोच्छी बंधाºयामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जुनी कामठी येथील कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या बंधाºयामुळे कन्हानलगत असलेली नदीपाण्याच्या शोधात आहे. कन्हान नगराला लागणाऱ्या पाण्याची पूर्तता कशी केली जाईल हा प्रश्न निर्माण होत आहे. जलशुद्धीकरण करण्यासाठी जल उपलब्ध असणे आवश्यक आहे. जर जल उपलब्ध नसेल तर शुद्धीकरण कशाचे केले जाईल हा नेमका प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. अस्वच्छतेमुळे कन्हान नदीचे पाणी दूषित होत असून स्रोतातून येणाऱ्या पाण्यापेक्षा वेकोलि व इतर नाल्यांच्या पाण्याने नदीचे पाणी दूषित होत आहे. जे भविष्यात मोठे आव्हान ठरणार आहे.पेंच प्रकल्पात फक्त ११ टक्के जलसाठापेंच प्रकल्पात तोतलाडोहमध्ये ९ टक्के तर एकूण प्रकल्पात ११ टक्के जलसाठा आहे. ज्यामुळे रबी हंगामाकरिता पाणी सोडण्यात आले नाही. फक्त नागपूरकरिता पाणी देण्यात येत असल्याची माहिती पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तुरखेडे यांनी दिली.जलशुद्धीकरण केंद्र निकामी ठरण्याची शक्यतामहाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कन्हान नदीवर १८ कोटी ९८ लाखाचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. कन्हान येथील जवळपास ३२ हजार लोकांना या केंद्रातून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु कन्हान नगराला प्रतिदिन जवळपास ६.४० लाख लिटर पाण्याची गरज आहे. जल शुद्ध करण्याकरिता सुमारे ६०/४० चा अनुपात वापरला गेला तर हे पाणी शुद्ध करण्याकरिता जवळपास १६ लाख लिटर प्रतिदिन पाण्याची आवश्यकता आहे. कन्हान नदीची वर्तमान स्थिती पाहता हे शक्य दिसत नाही.

कन्हान नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामुळे कन्हान येथील सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडण्यात येईल. यासोबत केंद्र सरकारद्वारे कन्हान न.प.अंतर्गत येणाऱ्या शिहोरा गावाजवळ मोठा बंधारा निर्माण करण्याची योजना आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न सुटेल.-शंकर चहांदे, नगराध्यक्ष, कन्हान.

टॅग्स :Waterपाणी