शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मृत्यू प्रमाणपत्राबाबत गलथानपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:04 IST

रुग्णाला वाचविण्यासाठी औषधांपासून ते इतर साहित्य उपलब्ध करून देण्याऱ्या नातेवाईकांची धडपड मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे धक्कादायक चित्र नागपूरच्या मेडिकलमधील आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांची धावपळ थांबेना...

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णाला वाचविण्यासाठी औषधांपासून ते इतर साहित्य उपलब्ध करून देण्याऱ्या नातेवाईकांची धडपड मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे धक्कादायक चित्र आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या नागपूरच्या मेडिकलमधील आहे. मृत्यूनंतर २१ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करणे व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक असताना, महिनोन्महिने होऊनही मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेला अर्जच रुग्णालयातून भरून दिला जात नसल्याचे वास्तव आहे. मेडिकल प्रशासनाच्या गलथानपणामुळे शेकडो नातेवाईकांना आप्तांचे दु:ख बाजूला सारून रुग्णालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.शासनाने जन्म-मृत्यूची नोंदणी आवश्यक असल्याची अट घातली आहे. मृत्यूचा दाखला असेल तरच संपत्तीवरील हक्क सांगता येतो, याशिवाय अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजासाठी हा दाखला महत्त्वाचा ठरतो. पूर्वी हे दाखले महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातच मिळायचे. आता मनपाच्या दहाही झोनमधून मिळतात. संबंधित इस्पितळाचे दस्तऐवज पाहूनच मृत्यूचा दाखला तयार केला जातो. परंतु येथेच घोळ होत आहे. मेडिकलमध्ये दिवसाकाठी सुमारे चार-पाच रुग्णांचा मृत्यू होतो. ज्या वॉर्डात किंवा अतिदक्षता विभागात मृत्यू झाला तेथील डॉक्टरांना मृत्यू प्रमाणपत्रासाठी ‘अर्ज ४’ व ‘८’ भरून मेडिकलच्या अभिलेखागारमध्ये पाठविणे बंधनकारक असते. पूर्वी हे बंधन ७२ तासांचे होते नंतर २१ दिवसांचे करण्यात आले. अभिलेखागारमध्ये याची नोंद झाल्यावर हे अर्ज महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयात प्रमाणपत्रासाठी पाठिवले जातात. मात्र महिनोन्महिने हे अर्ज भरले जात नाही.

डॉक्टर-कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवीमेडिकलच्या अतिदक्षता विभागात ४ मार्च २०१८ रोजी पंचफुला जवादे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेला अर्ज या विभागाने अभिलेखागार कक्षात पाठविलाच नाही. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचा मुलगा सुनील जवादे रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहे. ‘लोकमत’शी बोलताना सुनील म्हणाले, आईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी मेडिकलच्या अभिलेखागार कक्षात गेल्यावर तेथील कर्मचारी अर्ज आले नसल्याचे सांगून ते अतिदक्षता विभागात पाठवितात. तेथील परिचारिका, कर्मचारी डॉक्टरांना भेटू देत नाहीत. हाकलून लावतात. गेल्या पाच महिन्यांपासून हेच सुरू आहे. दाद मागवी तरी कोणाकडे हा प्रश्न आहे.

अधिष्ठात्यांच्या निर्देशालाही ठेंगाया समस्येला घेऊन काही महिन्यांपूर्वीच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले अर्ज तातडीने भरून अभिलेखागार पाठविण्याचे लेखी निर्देश सर्व वॉर्ड व विभागाला दिले आहेत. परंतु अधिष्ठात्यांच्या या निर्देशालाही संबंधितांनी ‘ठेंगा’ दाखविला आहे.

टॅग्स :Nagpur Government Medical College and Hospitalनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय