शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर नजर : गडचिरोलीतील स्फोटाने सुरक्षा यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:23 IST

रस्त्यात स्फोट घडवून गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांचा बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने सर्वत्र रोष निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी ठिकठिकाणच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर (समर्थक) नजर रोखली आहे. त्यांच्या हालचालीचीही नोंद घेतली जात आहे.

ठळक मुद्देशहरी समर्थकांच्या हालचालीची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यात स्फोट घडवून गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांचा बळी घेणाऱ्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने सर्वत्र रोष निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी ठिकठिकाणच्या फ्रंट ऑर्गनायझेशनवर (समर्थक) नजर रोखली आहे. त्यांच्या हालचालीचीही नोंद घेतली जात आहे.बुधवारी १ मे रोजीचा शासकीय कार्यक्रमाचा बंदोबस्त आटोपून कर्तव्यावर निघालेल्या गडचिरोलीतील पोलिसांच्या वाहनाला कुरखेडा तालुक्यातील मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून उडवून दिले. या स्फोटात १५ जवान आणि एक वाहनचालक असे १६ जण शहीद झाले. नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. शहीद झालेल्या जवानांपैकी बहुतांश जण त्यांच्या कुटुंबाचे कर्ते आणि एकमात्र आधार होते. त्यांच्या देहाच्या चिंधड्या करून नक्षल्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. मात्र, नक्षल्यांच्या बाजूने बोलणाऱ्या किंवा मानवाधिकारी पिपाणी वाजविणाऱ्या एकाही संघटनेने याबाबत निषेधाचे साधे पत्र काढलेले नाही. पोलिसांच्या गोळीबारात नक्षलवादी ठार झाला किंवा नक्षलवादी समर्थक म्हणून कुणाला अटक करण्यात आल्यास त्यांच्यावतीने कथित समाजसेवक लगेच पुढे येतात. ती कारवाई किंवा पोलिसांचा गोळीबार कसा निष्ठूर आणि बेकायदेशीर आहे, त्याबाबत आरडाओरड केली जाते. पत्रकार परिषदा घेऊन निषेध नोंदवतानाच पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते.सर्वसामान्य नागरिकांच्या जानमालाची सुरक्षा करण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या गडचिरोलीतील १५ पोलिसांसह १६ जणांच्या देहाच्या चिंधड्या नक्षलवाद्यांनी उडविल्या. या १६ जणांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनेकांच्या काळजाचे पाणी करणारा आहे. मात्र, नक्षल्यांनी घडविलेल्या या भीषण स्फोटाचा मानवाधिकार जोपासण्याची भाषा वापरणाऱ्या कथित समाजसेवकांकडून निषेध नोंदविण्यात आला नाही. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही त्यांच्यापैकी कुणाकडून झाले नाही किंवा त्यांच्यासाठी मदतीचा हातही कुणी पुढे केलेला नाही.कारवाईचे संकेतनक्षल्यांच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणि नक्षल्यांच्या क्रूर कृत्याचे एकप्रकारे छुुप्या पद्धतीने समर्थन करणाºया या नक्षल समर्थकांची आता काय भूमिका आहे, त्यांच्या काय हालचाली आहे, ते जाणून घेण्याचे तपास यंत्रणांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्यावर नजर रोखण्यात आली असून, पुढच्या काही दिवसांत शहरी नक्षलवादाच्या संबंधाने विविध शहरात कारवाईच्या रुपाने घडामोडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीBlastस्फोट