शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्ट महिन्यात आकाशात बघा नैसर्गिक दिवाळी, यानंतर दिसेल थेट १३३ वर्षांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 11:06 IST

Nagpur News ऑगस्ट महिन्यात आकाशात ताऱ्यांची आतषबाजी पाहण्याची संधी आहे. येत्या ११, १२ व १३ ऑगस्ट राेजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत नागरिकांना या नैसर्गिक फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीचा नजारा बघायला मिळेल.

ठळक मुद्देपृथ्वी जाईल धूमकेतूच्या ढिगाऱ्यातून

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :  ऑगस्ट महिन्यात आकाशात ताऱ्यांची आतषबाजी पाहण्याची संधी आहे. येत्या ११, १२ व १३ ऑगस्ट राेजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत नागरिकांना या नैसर्गिक फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीचा नजारा बघायला मिळेल. या तीन दिवसांत पर्सिड्स उल्कांचा वर्षाव हाेणार असून यावर्षीचा सर्वांत माेठा उल्का वर्षाव मानला जात आहे. हे दृश्य यानंतर १३३ वर्षांनंतर म्हणजे २१२६ सालीच दिसेल.

अंतराळात दरराेज असंख्य घडामाेडी घडत असतात. त्यातीलच ही एक. रमण विज्ञान केंद्राचे खगाेलशास्त्र शिक्षक महेंद्र वाघ यांनी याबाबत माहिती दिली. सूर्याभाेवती भ्रमण करणारा स्विफ्ट-टटल धूमकेतू सध्या पृथ्वीजवळून जात आहे. तब्बल २६ किलाेमीटर व्यास असलेला हा धूमकेतू प्रचंड वेगाने भ्रमण करीत आहे. सूर्याच्या जवळ असताना ताे पृथ्वीच्या कक्षेत असताे. हाच धूमकेतू पर्सिड उल्का शाॅवरचा जनक आहे. १७ जुलै ते २४ ऑगस्ट या काळात पृथ्वी स्विफ्ट टटल धूमकेतूच्या कक्षीय मार्गाच्या एकदम जवळून भ्रमण करीत आहे. यातील ११, १२ व १३ ऑगस्टला पृथ्वी या धूमकेतूच्या ढिगाऱ्यातून जाणार आहे. या धुमकेतूचे तुकडे पृथ्वीच्या वरच्या वातावरणात घुसतात. या धुमकेतूच्या तुकड्यांचा वेग २ लाख १० हजार किमी प्रति तास असताे. हे तुकडे रात्री वेगाने फिरणाऱ्या पर्सिड्स उल्कांसह प्रकाशमान हाेतात. दर मिनिटाला एक किंवा दाेन याप्रमाणे एका तासात ६० ते १३० रंगीबेरंगी उल्का पडताना दिसतील. शिवाय उल्का वर्षावामुळे धुमकेतूच्या ढिगाऱ्यातील तुकडे चमकतील आणि आकाशात आतषबाजी झाल्याचे चित्र दिसेल.

कुठे पाहता येईल?

- मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत पृथ्वीच्या काेणत्याही भागात.

- उत्तर ध्रुवावर उल्कांचा सर्वाेत्तम शाॅवर बघायला मिळेल.

- चंद्राची डार्क साइड असलेल्या भागात हे दृश्य अधिक चांगले दिसेल.

- निरभ्र आकाशाचा अधिकाधिक भाग दिसेल, अशा ठिकाणी बसा.

- अंधार राहील, याची काळजी घ्या. शक्यताे माेबाइल बंद ठेवा.

टॅग्स :Natureनिसर्ग