शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

देखो मेरी लाईफ... क्या जिंदगी हो गई है...  फरार गुन्हेगाराची भावनिक साद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 21:48 IST

Nagpur News पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी फरार असलेल्या एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या गुन्हेगाराची दशा दर्शित करणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

नागपूर : पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी फरार असलेल्या एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या गुन्हेगाराची दशा दर्शित करणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

सय्यद आसिफ सय्यद निजाम असे या गुंडाचे नाव आहे. तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. या गुंडावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याला शोधत आहेत. पोलिसांशी लपवाछपवी करणाऱ्या या गुन्हेगाराने फरारीमुळे झालेली आपली दैन्यावस्था दाखविण्यासाठी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यातून त्याने भावनिक साद घातली आहे.

या व्हिडिओत तो म्हणतो, ‘ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है...’ या गुन्हेगाराच्या अंगावर धड कपडे नाही. केस वाढले आहेत. झाडाझुडपात फिरावे लागत असल्याचे या व्हिडीओतून दाखवत त्याने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. आसिफचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओला त्याच्या भाऊबंदकीत अर्थात गुन्हेगारी वर्तुळात कशी दाद मिळते, हे तूर्त स्पष्ट नाही. मात्र त्याच्या व्हिडीओची लिंक पकडून त्याला हुडकून काढण्यासाठी पोलीस यंत्रणा कामी लागली आहे.

 

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी