शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर वर्ल्ड हेरिटेज साईट होणार; हायकोर्टात माहिती, पुरातत्व विभागाला मागितले उत्तर

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: January 24, 2024 19:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन व विकासाकरिता न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

नागपूर: रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळावा, यासाठी भारतीय पुरातत्व विभागाद्वारे प्रस्ताव तयार केला जात आहे, अशी माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला यासह लोणार सरोवर संवर्धनावर येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन व विकासाकरिता न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. एस. एस. सन्याल यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने लोणार सरोवर संवर्धन आराखड्याकरिता ३६९ कोटी रुपये दिले आहेत. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोणार सरोवर संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे.

काय असते वर्ल्ड हेरिटेजकाही स्थळांना विशेष सांस्कृतिक व भौगोलिक महत्व असते. विश्व संस्कृती टिकविण्यासाठी अशा स्थळांचे संरक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक ॲण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन )च्या वर्ल्ड हेरिटेज कमेटीद्वारे अशी वने, पर्वत, सरोवर, द्विप, वाळवंट, स्मारक, इमारती, कॉम्प्लेक्स, शहरे इत्यादीला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो. कमेटी या स्थळांची देखरेख करते. विशिष्ट परिस्थितीत या स्थळांना आर्थिक सहकार्यही केले जाते.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय