शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा जागतिक संत्रा महोत्सव : चार दिवसीय आयोजन १८ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 12:20 IST

लोकमतच्या वतीने जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ जानेवारीपासून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांची आर्थिक स्थिती सुधारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्या वतीने जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. विदर्भात संत्र्याचे उत्पादन कसे वाढविता येईल तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यावर महोत्सवात विशेष भर देण्यात येणार आहे.द्राक्षे, आंबे आणि डाळिंबाप्रमाणेच विदर्भातील शेतकरी संत्र्याचे उत्पादन कसे वाढवतील, यावर तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना विविध सत्रांमध्ये माहिती देण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे हे शेतकºयांना सर्वाधिक उत्पन्न देणारे फळ आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून पाच हजार कोटींची निर्यात करण्यात येते. आता डाळिंबाचीही स्थिती सुधारली आहे. अशावेळी विदर्भातील शेतकऱ्यांकडे संत्र्यासारखे सोने आहे. जगात त्याच्यासारखी दुसरी चव नाही. त्यांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनात का मागे राहावे, हा खरा प्रश्न आहे. याकरिता लोकमतचा महोत्सव शेतकऱ्यांच्या विकासाचा आणि सर्वांना सामावून घेणारा उपक्रम आहे. या महोत्सवात शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञान आणि संत्रा उत्पादन वाढीची माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी आणि मार्केटची गॅप कशी भरून निघेल तसेच घरगुती आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक फार्मिंग व सीड ते संत्रा फळापर्यंत सांगणार आहे. अमरावती रोड येथील आयसीएआर व सीसीआयआर या संस्थांतर्फे नव्याने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि सध्या सुरू असलेल्या संशोधनाची माहिती तसेच त्याचा उपयोग कसा करायचा, यावर सर्वंकष माहिती देण्यात येणार आहे.

जागतिक संत्रा महोत्सव १८ ते २१ जानेवारीपर्यंतयावर्षी लोकमततर्फे जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. शिवाय सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात वेगवेगळे उपक्रम आणि ग्राहक प्रदर्शन होणार आहे. तसेच २० आणि २१ जानेवारीला सिव्हिल लाईन्स येथील देशपांडे सभागृहात विविध कार्यक्रम होणार आहेत. शेतकऱ्यांना काही प्रश्न, समस्या असतील तर त्यांनी संपादकांच्या नावे पाठवाव्यात, असे आवाहन लोकमतने केले आहे. त्या सरकारदरबारी मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांशी बांधिलकीतुम्ही आज जेवलात ना मग शेतकरी आणि शेतमजुरांना धन्यवाद द्या. आतापासून शेती आणि शेतकऱ्यांसंबंधीचे सर्व विषय समाजासमोर येणे गरजेचे आहे. त्यासंबंधी चर्चा झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य दिसले पाहिजे आणि यासाठी जैन इरिगेशन कायम कटिबद्ध आहे.- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.

फळे टिकवून ठेवण्यावर संशोधनकंपनी संत्रा फळ जास्त काळ टिकवून ठेवण्यावर संशोधन करीत आहे. त्याकरिता नवीन उत्पादने तयार केली आहेत. शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि त्यांची जीवनशैली कशी वाढेल, यावर भर देण्यात येत आहे.- सागर कौशिक, अध्यक्ष,(कॉर्पोरेट अफेअर अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज रिलेशन),यूपीएल लिमिटेड.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल