शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतची उपांत्य फेरीत धडक

By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST

गतविजेत्या लोकमतने दैनिक भास्करचा १६९ धावांनी पराभव करीत स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धानागपूर : गतविजेत्या लोकमतने दैनिक भास्करचा १६९ धावांनी पराभव करीत स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. टाइम्स आॅफ इंडिया संघानेही अंतिम चार संघात स्थान मिळविले. वसंतनगर मैदानावर रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत दैनिक भास्कर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला. लोकमतने निर्धारित २० षटकांत २१० धावांची दमदार मजल मारली. सामनावीर नितीन श्रीवासने नाबाद ६५ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. अमित रोशनखेडेने नाबाद ५३ धावा फटकाविल्या. अमितने २१ चेंडूंना सामोरे जाताना ही अर्धशतकी खेळी साकारली. त्यात ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. सलामीवीर शरद मिश्रानेही (५० धावा, ४० चेंडू, १ षटकार, ७ चौकार) अर्धशतक झळकाविले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दैनिक भास्कर संघाचा डाव ६.३ षटकांत ४१ धावांत संपुष्टात आला. सचिन रहांगडालेने २७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत दैनिक भास्कर संघाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला सचिन खडके (४-१२) याची योग्य साथ लाभली. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या लढतीत लोकसत्ता संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ९४ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना टाइम्स आॅफ इंडिया संघाने विजयासाठी आवश्यक धावा १३.२ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. सोमवारी या स्पर्धेत पुण्यनगरी विरुद्ध हितवाद (डॉ. आंबेडकर महाविद्यालय मैदान) आणि सकाळ विरुद्ध तरुण भारत (वसंतनगर मैदान) यांच्यादरम्यान सामने होतील. दोन्ही सामने सकाळी ९.३० वाजता प्रारंभ होतील. (क्रीडा प्रतिनिधी) संक्षिप्त धावफलक१) वसंतनगर मैदान : लोकमत २० षटकांत ३ बाद २१० (नितीन श्रीवास ६५, अमित रोशनखेडे नाबाद ५३, शरद मिश्रा ५०; बंडू ढोरे व सूजन प्रत्येकी १ बळी) मात दैनिक भास्कर ६.३ षटकांत सर्वबाद ४१ (राहुल ठाकूर १९; सचिन रहांगडाले ५-२७, सचिन खडके ४-१२).निकाल : लोकमत १६९ धावांनी विजयी. सामनावीर : नितीन श्रीवास.२) डॉ. आंबेडकर महाविद्यालय मैदान : इंडियन एक्स्प्रेस-लोकसत्ता २० षटकांत ६ बाद ९४ (मंदार मोरणे १७, सुदर्शन साखरकर १५, हर्षवर्धन दातीर १३; फझुल कमर ३-११, संदीप दाभेकर, पीयूष पाटील प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध टाइम्स आॅफ इंडिया १३.२ षटकांत ५ बाद ९७ (सुहास नायसे ३२, सुबोध रत्नपारखी १९, फैझुल कमर व सूरज नायर प्रत्येकी १० धावांवर नाबाद; शरद परतेकी ४-३१). निकाल : टाइम्स आॅफ इंडिया ५ गड्यांनी विजयी. सामनावीर : फैझुल कमर.