संधी : मिळणार भेटवस्तू , एक लाखाचा विमा, गोल्डन धमाका आणि भाग्यशाली योजना, कार्यालय आणि विभाग प्रतिनिधींजवळ अर्ज उपलब्धनागपूर : लोकमत सखी मंचची वार्षिक सदस्यता नोंदणी १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी शहरातील निर्धारित केंद्रांवर करण्यात येणार आहे. सखी मंचने यंदा १५ वर्षे पूर्ण करून १६ व्या वर्षांत यशस्वी पदार्पण केले आहे. सोळाव्या वर्षात प्रवेशाच्या वेळी मंच अधिकाधिक सखींना जोडणार आहे. या घटनेची सखी वर्षभर प्रतीक्षा करीत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन दिवसातच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील ३० विभागात ही नोंदणी करण्यात येईल. या दोन दिवसात महिलांना त्यांची नोंदणी जवळच्या केंद्रात जाऊन करणे आवश्यक आहे. मागील वर्षीही दोन दिवस नोंदणी करण्यात आली होती. या संधीचा लाभ सखींनी मोठ्या प्रमाणात घेतला. नोंदणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. (प्रतिनिधी)
३७ केंद्रांवर लोकमत सखी मंचची सदस्यता नोंदणी उद्यापासून
By admin | Updated: February 12, 2016 03:14 IST