शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

लोकमत महामॅरेथॉनमधून मिळतो सर्वांना सर्वधर्मसमभावाचा संदेश; राजाभाऊ टांकसाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 11:47 IST

११ फेब्रुवारी रोजी कस्तूरचंद पार्कवर नागपूर महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांत तंदुरुस्तीचा नवा संदेश देत असतानाच ऐतिहासिक शहरात सर्वधर्मसमभाव जपण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे.

ठळक मुद्देमॅरेथॉन हा उत्सवांचा उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकमत समूहाने अनेक समाजोपयोगी आणि अनेक प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजन करून शहरातील कलावंत व खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. ११ फेब्रुवारी रोजी कस्तूरचंद पार्कवर नागपूर महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांत तंदुरुस्तीचा नवा संदेश देत असतानाच ऐतिहासिक शहरात सर्वधर्मसमभाव जपण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे. रविवारी होणाऱ्या या आयोजनाबद्दल नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष ओढ असून किमान पाच किलोमीटर अंतर तरी धावायचेच, अशी मनोमन इच्छा प्रबळ झाली आहे,समाजात एकोपा निर्माण करणे यास असे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते, शिवाय फिटनेसविषयी प्रचंड जागरूकता निर्माण होते. लोकमत समूहदेखील महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांमध्ये तंदुरुस्तीचे महत्त्व रुजविण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे.शरीर सुदृढ राहावे हे कुणाला आवडणार नाही. आजच्या युवा पिढीत जीम संस्कृतीची क्रेझ पाहायला मिळते. त्याचवेळी जंक फूड खाणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा विळखा घट्ट होत आहे. आजारग्रस्त होणाऱ्यांमध्ये बालकांपासून वयोवृद्धांचाही समावेश आढळतो. तथापि रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी धावण्यासारखा स्वस्त असा व्यायाम नाही. धावण्याचे फायदेही अनेक आहेत. हजारो लोक एकाचवेळी एकत्र येतात तेव्हा उत्साह सळसळतो. म्हणूनच मॅरेथॉन हा ‘उत्साहाचा उत्सव’ असेही संबोधल्यास वावगे ठरणार नाही.झोपप्रिय युवा पिढीला हलवून जागे करण्यासाठी वारंवार असे आयोजन व्हायलाच हवे. त्यामुळे आतापर्यंत धावले नसतील असे लोक इतरांकडून प्रोत्साहन घेत धावण्यास सज्ज होऊ शकतात. आळस झटकून मैदानावर येण्यास तत्पर होऊ शकतील. कुठल्याही वयात व्यायाम आणि धावण्याचा सराव सुरू केला तरी तो व्यर्थ जात नाही. पुढील आयुष्य सोपे आणि आनंदमय होते. लोकमतने जुळवून आणलेला ‘महामॅरेथॉन’रूपी योग ही संधी मानून धावायला लागा. वाढता... वाढता... वाढे, या म्हणीप्रमाणे धावण्याचे तंत्र अंगी येईल, या आशेने आजच सुरुवात करा. मी माझ्या आरोग्यासाठी धावतो, हे ब्रीद नेहमी लक्षात असू द्या. निरोगी वाटचालीसाठी हे आवश्यक आहे.

टॅग्स :Lokmat Nagpur Maha Marathon 2018लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८