शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट :अखेर निराधारांचे मानधन खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:16 IST

संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे मानधन अखेर त्यांच्या खात्यात जमा झाले. लोकमतने यासंदर्भात पुढाकार घेत हा विषय लावून धरला होता. जिल्हाधिकारी मुदगल यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली होती. अखेर मानधन जमा झाल्याने लाभार्थ्यांनाही दिलासा मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे मानधन अखेर त्यांच्या खात्यात जमा झाले. लोकमतने यासंदर्भात पुढाकार घेत हा विषय लावून धरला होता. जिल्हाधिकारी मुदगल यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतली होती. अखेर मानधन जमा झाल्याने लाभार्थ्यांनाही दिलासा मिळाला.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे मार्च ते मे २०१९ या तीन महिन्याचे मानधन यंदा एकाचवेळी मंजूर करण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे हे मानधन ११ जून ते १५ जून या दरम्यान अ‍ॅक्सीस बँकेत जमा करण्यात आले होते. अ‍ॅक्सीस बँक ही या याजनेंतर्गत अनुदान वाटपाची मध्यवर्ती बँक आहे. येथून निधी लाभार्थी असलेल्या विविध बँकांना वितिरत केला जातो. त्यानंतर संबंधित बँक ती लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करते. जिल्हा प्रशासनाकडून निधी पाठवण्यात आला. परंतु तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालाच नाही. जून महिना संपत आला तरी मानधन जमा झाले नव्हते. लाभार्थी बँकेच्या चकरा मारायचे. परंतु मानधन जमा झाले नाही, असे सांगून त्यांना परत पाठविले जात होते. लोकमतकडेही यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तेव्हा मानधन कधीचेच बँकेला पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून मानधन बँकेला गेले तर मग ते अडले कुठले. लाभार्थ्यांच्या खात्यात का जमा झाले नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी याची गंभीर दखल घेत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले. निवासी उपल्हिाधिकारी रवींद्र खजांची यांनी अ‍ॅक्सीस बँकेला सविस्तर पत्र पाठवून लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करण्याचे निर्देश बजावले आहेत. त्यानंतरही उशीर झाला. तेव्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत मानधन लाभार्थ्यांना उशिरा मिळाल्यास संबंधितांना दोषी ठरले जाईल, असे निर्देश बजावले. यानंतर चक्रे गतीने फिरली. अखेर मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले.कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरजसंजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यातील लाभार्थी हे बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे मानधन कधीच वेळेवर जमा होत नाही, हा अनुभव आहे. ज्येष्ठ नागरिक असल्याने ते फारसा आवाज उचलू शकत नाहीत. लाभार्थ्यांना नियमित अनुदान मिळावे यासाठी तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ही केवळ यावेळचीच समस्या न समजता यासंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर