शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : निराधारांचे मानधन त्यांच्या खात्यात तातडीने जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:31 IST

संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे मानधन अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ते तातडीने जमा व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे यासंदर्भात बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पत्र पाठवण्यात आले असून मानधन विलंबाने जमा झाल्यास आपल्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बँकेला दिला कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे मानधन अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ते तातडीने जमा व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे यासंदर्भात बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पत्र पाठवण्यात आले असून मानधन विलंबाने जमा झाल्यास आपल्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे मार्च ते मे २०१९ या तीन महिन्यांचे मानधन एकाचवेळी मंजूर करण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे हे मानधन ११ जून ते १५ जून या दरम्यान अ‍ॅक्सिस बँकेत जमा करण्यात आले. अ‍ॅक्सिस बँक ही या योजनेंतर्गत अनुदान वाटपाची मध्यवर्ती बँक आहे. येथून निधी लाभार्थी असलेल्या विविध बँकांना वितरीत केला जातो. त्यानंतर संबंधित बँक तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करते. जिल्हा प्रशासनाकडून निधी पाठवण्यात आला. परंतु तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालाच नाही. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी याची गंभीर दखल घेत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले. निवासी उपल्हिाधिकारी रवींद्र खजांची यांनी अ‍ॅक्सिस बँकेला सविस्तर पत्र पाठवून लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करण्याचे निर्देश बजावले आहेत.याप्रकरणाची पूर्ण चौकशी कराअनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात का पोहोचले नाही, याची सविस्तर चौकशी करण्यासही तहसीलदारांना बजावण्यात आले आहे. प्रत्येक बँकेकडून अहवाल मागवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच काही लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे मानधन मिळाले. परंतु मार्चचे जमा झाले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयbankबँक