शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

लोकमत अजिंक्य

By admin | Updated: January 23, 2017 02:02 IST

लोकमतने रविवारी अंतिम लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना रविवारी टाइम्स आॅफ इंडिया (टीओआय)

अंतिम लढतीत टीओआयवर ३३ धावांनी मात : लोखंडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू नागपूर : लोकमतने रविवारी अंतिम लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना रविवारी टाइम्स आॅफ इंडिया (टीओआय) संघाचा ३३ धावांनी पराभव केला आणि १९ व्या ओसीडब्ल्यू-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) ओसीडब्ल्यू आणि एसबीआयच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत लोकमत संघाने खेळाच्या सर्वंच विभागात वर्चस्व गाजवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या लोकमत संघाने २० षटकांत ५ बाद १४३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. निराशाजनक सुरुवातीनंतर शरद मिश्रा (४४ धावा, ३६ चेंडू, १ षटकार, ३ चौकार) आणि कर्णधार अमित खोडके (३८ धावा, ३३ चेंडू, ४ चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. त्यानंतर नितीन श्रीवासने १३ चेंडूंना सामोरे जाताना २९ धावांची खेळी केली. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. त्याआधी, लोकमतची सुरुवातीला ६.४ षटकांत ३ बाद ३० अशी अवस्था झाली होती. आक्रमक नितीन पटारिया (११) आणि प्रवीण लोखंडे (६) धावबाद झाल्यामुळे संघाचा डाव अडचणीत आला होता.पण, त्यानंतर मिश्रा व खोडके यांनी डाव सावरला आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. प्रत्युत्तरात खेळताना टीओआय संघाने विकेट गमावल्या. त्यांचा डाव २० व्या षटकांत ११० धावांत संपुष्टात आला. सलामीवीर प्रतीक सिद्धार्थ (४७) याने एकाकी झुंज दिली. त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही. लोकमततर्फे प्रवीण लोखंडे, नितीन श्रीवास व नितीन पटारिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. अंतिम सामन्यानंतर ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय राय, स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक विनायक कुलकर्णी, क्रीडा संयोजक अनिल अहिरकर, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप मैत्र, एनयूडब्ल्यूजे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, दृष्टी कम्युनिकेशन्सचे संजय चिंचोळे तसेच दादासाहेब बालपांडे कॉलेज आॅफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला महाजन यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे सदस्य डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले तर कोषाध्यक्ष सुहास नायसे यांनी आभार मानले.(क्रीडा प्रतिनिधी) संक्षिप्त धावफलक लोकमत २० षटकांत ५ बाद १४३ ( शरद मिश्रा ४४, अमित खोडके ३८, नितीन श्रीवास २९, नितीन पटारिया ११, प्रवीण लोखंडे ६; सूरज नायर, संदीप दाभेकर व विनय पांडे प्रत्येकी एक बळी). टीओआय २० षटकांत सर्वबाद ११० (प्रतीक सिद्धार्थ ४७, रुपेश भाईक १४, मंदार मोरोणे, पीयूष पाटील व संदीप दाभेकर प्रत्येकी १०; प्रवीण लोखंडे २-६, नितीन श्रीवास २-१७, नितीन पटारिया २-२५, शरद मिश्रा व आशिष बुधोलिया प्रत्येकी १ बळी). निकाल : लोकमत ३३ धावांनी विजय. सर्वोत्तम झेल - नितीन पटारिया. वैयक्तिक पुरस्कार सर्वोत्तम खेळाडू : प्रवीण लोखंडे (लोकमत), सर्वोत्तम फलंदाज : विनय पांडे (टीओआय), सर्वोत्तम गोलंदाज : शरद मिश्रा (लोकमत), सर्वोत्तम यष्टिरक्षक : अमित खोडके (लोकमत), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : रुपेश भाईक (टीओआय), अंतिम सामन्यातील सामनावीर : शरद मिश्रा (लोकमत). पाच बळी घेणारे गोलंदाज : शरद मिश्रा (लोकमत) आणि प्रवीण लोखंडे (लोकमत). शतकवीर फलंदाज : प्रवीण लोखंडे (लोकमत).