शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा नागपूर २००९; अखेरच्या षटकात विजयी चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:33 IST

प्रत्यक्षात मुत्तेमवार यांच्यावर परंपरागत मतदारांनी परत एकदा विश्वास टाकला व ते सलग चौथ्यांदा निवडून आले. एखाद्या अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या क्षणी विजयी चौकार मारल्याप्रमाणेच हा त्यांचा विजय होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: २००९ सालची लोकसभा निवडणूक नागपुरात बदल घडवून आणेल अशा चर्चांमुळे तापली होती. पक्षांतर्गत असलेला विरोध, मतदारसंघाची पुनर्रचना आणि विरोधकांमधील आक्रमकता अशा स्थितीत तत्कालीन विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासाठी निवडणूक अवघड मानण्यात येत होती. मुत्तेमवारांवर भाजपात परत आलेले बनवारीलाल पुरोहित हे भारी ठरतील, असे राजकीय धुरिणांचे अंदाज होते. मात्र प्रत्यक्षात मुत्तेमवार यांच्यावर परंपरागत मतदारांनी परत एकदा विश्वास टाकला व ते सलग चौथ्यांदा निवडून आले. एखाद्या अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या क्षणी विजयी चौकार मारल्याप्रमाणेच हा त्यांचा विजय होता.२००९ च्या निवडणुकांत संपुआसाठी सकारात्मक चित्र दिसून येत होते. ‘जय हो’ या गाण्याचा आधार घेत तयार केलेले प्रचारगीत गाजत होते. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर करत रालोआने ‘गुड गव्हर्नन्स’वर भर दिला होता. या निवडणुकीत राममंदिराचा मुद्दा मागे पडला होता. याशिवाय तिसरा व चौथा मोर्चा यांचेदेखील आव्हान होते.२००४ च्या निवडणुकीत संपूर्ण विदर्भात कॉंग्रेसला केवळ नागपूरची जागा मिळाली होती. त्यामुळे यावेळीदेखील कॉंग्रेस नागपुरात पूर्ण तयारीनिशी उतरणार असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात कॉंग्रेसमध्ये विलास मुत्तेमवार विरुद्ध सतीश चतुर्वेदी हा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गटांमधून विस्तवही जात नव्हता. मुत्तेमवार यांना तिकीट मिळू नये यासाठी विविध नेते सरसावले होते. मात्र अखेरीस मुत्तेमवार यांनाच उमेदवारी घोषित झाली. या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती व पारंपरिक ‘व्होटबँक’ असलेला कामठीचा भाग रामटेक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाला होता. सोबतच भारिप बहुजन महासंघाने साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर व बसपाने माणिकराव वैद्य यांना तिकीट दिले होते. त्यामुळे दलित मतदारदेखील या दोघांकडे वळण्याची शक्यता होती. दुसरीकडे बनवारीलाल पुरोहित परत एकदा भाजपाच्या झेंड्याखाली आले होते व भाजपाने त्यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती. बरिएमंतर्फे सुलेखा कुंभारे यादेखील रिंगणात होत्या. एकूण १३ अपक्षांसह नागपूर मतदारसंघातून २६ उमेदवार एकमेकांविरोधात उभे होते.नागपुरात भाजपाचा चढता आलेख होता. महानगरपालिका, मेट्रो रिजन, डीपीडीसी, पदवीधर मतदारसंघ, विधान परिषदेच्या निवडणुका भाजपाने जिंकल्या होत्या. मात्र थेट मैदान मारता आले नव्हते. या निवडणुकांत विकासाला मुद्दा बनविण्यात आले होते पुरोहितांचा जनसंपर्क, राजकारण व प्रशासनाचा दांडगा अ़नुभव यामुळे त्यांचे पारडे जड वाटत होते.कामठी व नागपूर ग्रामीणचा भाग रामटेकमध्ये गेल्याने कॉंग्रेसला फटका बसेल असे चित्र होते. मात्र मिहान, आंतरराष्ट्रीय कार्गो, आंतरराष्ट्रीय विमानतळ यावर प्रचारादरम्यान विशेष ‘फोकस’ करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वांना मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची सूचना केली होती. माणिकराव वैद्य हे भाजपाचे जिल्हाध्यक्षपद सोडून बसपाच्या हत्तीवर सवार झाले होते. शिवाय यशवंत मनोहर यांच्या बाजूने रिपब्लिक चळवळीतील अनेक जण प्रचारात उतरले होते. त्यामुळे कॉंग्रेसला निवडणूक जड जाणार असे सर्वांनाच वाटत होते. या निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले होते.मात्र निकाल जाहीर झाल्यावर सर्वांना परत एकदा धक्का बसला. मुत्तेमवार यांनी २४ हजार ५९९ मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यांना ४१.५९ टक्के मतं मिळाली होती, तर पुरोहित यांच्या वाट्याला ३८.३७ टक्के मतं आली होती. माणिकराव वैद्य यांनी १५.६७ टक्के मतं घेत सर्वांनाच अचंबित केले होते. ही त्यांची तिसरी निवडणूक होती हे विशेष.

मनोहरांचा ‘लेटर’बॉम्बनिवडणुकीच्या अगोदर राज्याचे माजी महाधिवक्ता व्ही. आर. मनोहर यांच्या एका पत्राने खळबळ उडाली होती. त्यांनी विधी क्षेत्रातील लोकांना पत्र पाठवून बनवारीलाल पुरोहित यांना मतं देण्याचे आवाहन केले होते. मनोहर यांचे समाजात एक मानाचे स्थान होते व ते प्रथमच अशा प्रकारे उघडपणे समोर आले होते. योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ आली आहे, असे पत्राच्या माध्यमातून त्यांनी म्हटले होते. यामुळे बरीच चर्चा झाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक