शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लोकसभा नागपूर २००४; काँग्रेसची अनोखी ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:06 IST

एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले.

 योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकीत देशाचे वातावरण बदलायला लागले होते. ‘शायनिंग इंडिया’चे वारे देशभरात वाहत होते. शिवाय १९९६ ते १९९९ या काळातील राजकीय अस्थिरतादेखील संपली होती. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज राजकीय धुरिणांकडून वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले. विलास मुत्तेमवार यांनी सलग तिसऱ्यांदा नागपुरातून विजय मिळविला. अशा प्रकारची ‘हॅटट्रीक’ करणारे ते पहिलेच उमेदवार ठरले.१९९९ ते २००४ या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल भाजपाला प्रचंड विश्वास होता. देशात ‘इंडिया शायनिंग’ची मोहीम राबविण्यात आली होती. वाजपेयी सरकारने सात महिने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेचा कालावधी आॅक्टोबर २००४ पर्यंत असताना, मे महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. देशात ‘फील गुड फॅक्टर’चा फायदा घेण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले होते.नागपुरात काँग्रेसने परत एकदा विलास मुत्तेमवार यांनाच उमेदवारी दिली. मात्र खरी गोची झाली होती ती भाजपाची. विलास मुत्तेमवार यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत अनेक दिवस बैठकांचा जोर चालला. अखेर भाजपाचे साधे सदस्यही नसलेले माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंह यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी हा संघभूमीत एक नवा प्रयोगच होता. तर नागपुरातून तीनदा खासदार राहिलेले तसेच काँग्रेस व भाजपावासी राहिलेल्या बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील विदर्भ राज्य पार्टीतर्फे आव्हान उभे केले. त्यामुळे नागपुरात तिरंगी लढत असल्याचे मानण्यात येत होते. याशिवाय बसपातर्फे जयंत दळवी, अपक्ष म्हणून प्रकाश निमजे हेदेखील उभे झाले होते. नागपूर लोकसभेच्या रणधुमाळीत एकूण १४ उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.विलास मुत्तेमवार यांनी कार्गो हब, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिहान या मुद्यांवर प्रचार सुरू केला होता. विलास मुत्तेमवार यांना नेमकी यंत्रणा, जातीय समीकरणे यांची चांगलीच जाण होती. तर अटलबहादूर सिंह यांची प्रामाणिक छबी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचे काम या मुद्यांवर भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात उतरले. अटलबहादूर सिंह हे तीन दशकांपासून नागपूरच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे नाव सर्वांनाच परिचित होते. त्यांची हयात ही धर्मनिरपेक्ष संघटनांसाठी काम करण्यात गेली होती. मात्र ते मूळचे भाजप व संघाचे नसल्यामुळे पक्षातील ‘कमिटेड’ मतांची नाराजी कुठेतरी भोवेल का असा प्रश्नदेखील उपस्थित होत होता. एकेकाळी महानगरपालिकेत ‘किंगमेकर’ राहिलेले अटलबहादूर आता स्वत:च ‘किंग’ बनण्यासाठी सरसावले होते. बनवारीलाल पुरोहित यांनी विदर्भ हाच प्रचाराचा मुद्दा बनविला होता व विदर्भवादी त्यांच्या पाठीशी होते.लोकसभेचे निकाल जाहीर झाले तेव्हा विदर्भात सगळीकडे युतीचा झेंडा होता. मात्र नागपुरात परत एकदा भाजपा-शिवसेनेला अपयशाचा सामना करावा लागला. ४७.१६ टक्के मतांसह मुत्तेमवार यांनी परत एकदा विजय मिळविला. अटलबहादूर सिंह यांच्या वाट्याला ३४.६१ टक्के मतं आली. मुत्तेमवार यांचे मताधिक्य हे सुमारे एक लाखाचे होते. बनवारीलाल पुरोहित हे ३.५२ टक्के मतांसह थेट पाचव्या स्थानावर घसरले.

‘अटल’साठी ‘अटल’जींची सभा१६ मार्च २००४ रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वाजपेयी यांची कस्तूरचंद पार्कवर झालेली सभा ‘हाऊसफुल्ल’ ठरली होती. यावेळी त्यांनी अमेरिकेसह कुणासमोरही झुकणार नाही, असे म्हणत ‘न दैन्यम्, न पलायनम्’ या शब्दांत आपली भूमिका मांडली होती. अर्जुनासारखा मी मैदानात कायम राहील, कुणाच्या दबावाखाली येणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, असे म्हणत ‘पोखरण’ येथे केलेल्या अणूचाचण्यांवर भाष्य केले होते. या सभेत भाषण संपवून बसण्याअगोदर वाजपेयी यांनी अटलबहादूर सिंग यांना हात धरून समोर आणले. ‘मी समजत होतो केवळ अटल असणेच पुरेसे असते. पण येथे अटल बहादूर झाले आणि वरून सिंह’, अशी शाब्दिक कोटी करताच मैदानात खसखस पिकली होती. याच सभेत मी कधीही इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’ म्हटले नाही, अशी त्यांनी स्पष्टोक्ती केली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक