शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

लोकसभा नागपूर १९७१; विदर्भवाद्यांच्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:01 IST

देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता. तर १९७१ सालीदेखील विदर्भवादी नेत्यासमोरच कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला. विशेष विशेष म्हणजे दोन्ही वेळेला कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा हेच उमेदवार होते. विदर्भवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव धोटे हे संसदेत पोहोचले.१९७१ ची निवडणूक ही खरे तर मध्यावधी निवडणूक ठरली. त्या निवडणुकांमध्ये नागपुरातून पाच उमेदवार मैदानात होते. यात कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा, फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबुवंतराव धोटे, खोरिपाचे काट्टी अप्पा, भाकपाचे ए.बी.बर्धन, व अपक्ष उमेदवार वहाब होते. विशेष म्हणजे जनसंघाने या निवडणुकांत उमेदवार उभा केला नव्हता. १९६९ साली कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेस पक्ष दुभंगला होता. इंदिरा गांधी यांचे समर्थन करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांचा जास्त कल होता. विदर्भात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची लाटच दिसून येत होती. त्यामुळेच नागपूरची जागादेखील कॉंग्रेसला सहज मिळेल असा कयास वर्तविण्यात येत होता.विदर्भाच्या आंदोलनामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले जांबुवंतराव धोटे हे यवतमाळ तसेच नागपूर अशा दोन्ही जागांवर उभे होते. धोटे हे १९६७ साली यवतमाळ येथून निवडणूक लढले होते, मात्र त्यावेळी त्यांच्या पदरी अपयश आले होते. परंतु त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा अनुभव मिळाला होता. विधिमंडळात १९६२ आणि १९६७ या दोन्ही निवडणुकांत जिंकून ते गेले होते व विदर्भवीर म्हणून त्यांची ओळख होती. स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन जोरात सुरू होते. धोटे यांच्याकडे विदर्भात अपेक्षेने पाहिले जायचे. त्यामुळे विदर्भवादी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे होते. ए.बी.बर्धन हेदेखील मोठे नाव होते व मागील निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर त्यांना यंदा यश मिळेल अशी आशा कामगार वर्गाला होती. त्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही १० टक्क्यांच्या जवळपास घटली व त्यामुळे प्रत्येकच पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.मतगणना होत असताना प्रत्येक क्षण उत्कंठावर्धक होता. कधी शर्मा तरी कधी धोटे समोर होते. प्रत्येक फेरीनंतर कल इकडेतिकडे होत होता. अखेर जांबुवंतराव धोटे यांना १ लाख २५ हजार ५५२ मतं (३७.०९ टक्के) मिळाली तर रिखबचंद शर्मा यांना १ लाख २३ हजार ४९६ मतं (३६.४८ टक्के) प्राप्त झाली. अखेरपर्यंत रंगलेल्या लढतीत धोटे यांनी २ हजार ५६ मतांनी बाजी मारली होती. कट्टी अप्पा यांना १६.२६ टक्के मतं मिळाली. तर ए.बी.बर्धन यांना केवळ ९.९७ टक्के मतं मिळाली व ते चौथ्या स्थानी राहिले. अपक्ष उमेदवाराला केवळ ६५१ मतं मिळाली व त्यांची जमानत जप्त झाली होती.शर्मांनी निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले. मात्र हा खटला धोटे यांनीच जिंकला.-योगेश पांडे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक