शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:48 IST

१९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली. १९५२ साली पूर्व विदर्भ महिला परिषदेची स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावर जागा मिळवून दिली. आजवर या इमारतीच्या माध्यमातून हजारो महिलांना आसरा मिळाला आहे. अनसुयाबाई काळे यांनी आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यातून आदर्श निर्माण केला होता.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात लढलेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. १९५२ प्रमाणे १९५७ च्या या निवडणुकांतदेखील नागपूरने इतिहास घडविला. नागपूरच्या पहिल्यावहिल्या खासदार अनसूयाबाई काळे यांनी सातत्याने दुसऱ्यांदा विजय मिळवीत महिलाशक्तीचा परिचय करून दिला होता.मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने आठऐवजी विदर्भात नऊ मतदारसंघ तयार केले. यात नागपूरचे स्थान महत्त्वाचे होते. १९५२ ते १९५७ दरम्यानची कामगिरी लक्षात घेता, काँग्रेसने परत अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते. तर ‘आॅल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन’तर्फे हरिदास आवाडे हे कट्टर प्रतिस्पर्धी मानण्यात येत होते. याव्यतिरिक्त नरेंद्र देवघरे हे प्रजा सोशालिस्ट पक्ष तसेच के.डी. परांजपे हे अपक्ष म्हणून उभे होते. केवळ चारच उमेदवार रिंगणात होते व त्यामुळे सर्वांनी आपापल्यापरीने जोरदार प्रचार केला होता. १९५२ च्या तुलनेत या निवडणुकांत मतदान किंचित वाढले व मतदानाची टक्केवारी सुमारे ६० टक्के इतकी होती. अनसूयाबाई काळे यांच्या मतांमध्ये घट झाली, मात्र ४६.८३ टक्के मतं प्राप्त करीत त्यांनीच विजय मिळविला. दुसºया स्थानावर आवाडे राहिले.त्यांना २८.८६ टक्के मते मिळाली होती. तिसºया स्थानी आलेल्या प्रजा सोशालिस्ट पक्षाच्या उमेदवाराने सर्वांना अचंबित करीत २२.३८ टक्के मतं प्राप्त केली होती. परांजपे यांच्या वाट्याला मात्र केवळ १.९२ टक्के मते आली होती.

विदेशातदेखील दाखविले कर्तृत्वअनसूयाबाई या नागपूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात १९३० पासूनच कार्यरत होत्या. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा स्थापन केली होती. कॅनडातील अखिल विश्व महिला संमेलनात त्यांनी भारतीय महिलांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९२८ मध्ये त्या सी.पी.अ‍ॅन्ड बेरार लेजिल्सेटिव्ह कौन्सिलच्या प्रथम महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. १९३३ मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन दौरा काढला होता. त्यात अनसूयाबाईदेखील महात्मा गांधी यांच्यासोबत मध्य प्रांतात होत्या. १९३५ मध्ये त्या मध्य प्रांत विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणूनदेखील निवडून आल्या. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सरकारी पदाचा त्याग केला व तुरुंगवास देखील भोगला. १९४३ साली चिमूर आष्टी येथे दडपशाहीने हत्याकांड झाले व यात सात जणांना फाशीची शिक्षा झाली. या सात भारतीयांना वाचविण्यासाठी काळे यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक