शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; सोशल मीडियावरही वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 10:18 IST

यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या सोशल मीडियावरही प्रशासनाची नजर राहील, हे विशेष.

ठळक मुद्देप्रशासन ‘इलेक्शन मोड’वर अर्जामध्ये भरावी लागणार ‘डिटेल’ माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून प्रशासन इलेक्शन मोडवर आले आहे. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक पहिल्याच टप्प्यात होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभेची पोटनिवडणूकही होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या सोशल मीडियावरही प्रशासनाची नजर राहील, हे विशेष.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारा निवडणुकीबाबतच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच जे अ‍ॅफिडेव्हीट द्यावे लागते, त्यात यंदा उमेदवारांना ते वापरत असलेले व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युुब आदीची माहितीही भरावयाची आहे. यासोबतच पेड न्यूवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटीच स्थापनाही करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये मीडियाच्या प्रतिनिधीसह सायबर तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. यावेळी सोशल मीडियावरील जाहिरातीवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापती शीतल उगले, सीईओ संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होेते.

जाहिरात प्रकाशनासाठी मंजुरी आवश्यकजाहिरातीवर नजर ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. जाहिरात किंवा प्रचार साहित्याचा मजकूर (आॅडिओ-व्हिडीओ) प्रकाशन करण्यापूर्वी तो मीडिया मॉनिटरिंंग कमिटीला दाखविणे बंधनकारक आहे. त्यांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ते प्रकाशित केले जाईल.पेड न्यूजसंदर्भात काही तक्रार आल्यास २४ तासाच्या आत समितीला त्यावर निर्णय घ्यायचा आहे. समितीकडे तक्रार असल्यास कमिटीची तातडीची बैठक होईल. त्याची खातरजमा केली जाईल. त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधितांना नोटीस पाठवून खुलासा मागवला जाईल. खुलासा समाधानकारक राहिला तर ठीक अन्यथा पेड न्यूजचा खर्च संबंधिताच्या खात्यात जोडला जाईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९