शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Lok Sabha Election 2019; नॉमिनेशनसाठी होणार धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 12:11 IST

रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देधुलिवंदन व शनिवार-रविवारची सुटी१९, २०, २२ व २५ असे चारच दिवस शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु यादरम्यान तीन दिवस शासकीय सुटी असल्याने अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवस मिळत आहेत. तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना धावाधाव करावी लागणार आहे.राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघासाठी सोमवारपासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. २१, २३ व २४ मार्चची सुटी आल्याने उमेदवारांना १९, २०, २२ व २५ मार्च असे चारच दिवस मिळणार आहेत. नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून, उमेदवारांच्या अर्जाची छाननी २६ मार्च रोजी करण्यात येईल. २८ मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.४अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराने नामनिर्देशनपत्र नमुना २ अ, नमुना २६ (नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र), शपथेचा किंवा दृढकथनाचा नमुना, छायाचित्राबाबतचे शपथपत्र, स्वाक्षरीचा नमुना आणि मतपत्रिकेतील नावाबाबत पत्र सादर करावयाचे आहे.या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून उमेदवाराची अपराधिक माहिती, उमेदवारांकडून कायद्याचे झालेले उल्लंघन, दोष सिद्ध ठरवले किंवा नाही याचा तपशील, मागील पाच वर्षांत आयकर विवरण पत्रात दर्शविलेले एकूण उत्पन्न, पॅन क्रमांक, आयकर विवरण पत्र भरल्याची स्थिती, फौजदारी खटले, खटल्याचा तपशील, आदी माहिती सादर करावयाची आहे.राज्य व देशातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अर्ज सादर करताना प्रस्तावक (सूचक) म्हणून एक व्यक्ती ग्राह्य धरला जाईल, तर स्वतंत्र (अपक्ष) उमेदवारास १० व्यक्ती प्रस्तावक म्हणून आवश्यक राहतील. तेही ज्या लोकसभा मतदार संघासाठी ते अर्ज करणार आहेत त्याच मतदार संघातील प्रस्तावक असणे गरजेचे असल्याचेही मुदगल यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक