शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 10:36 IST

रामटेक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो. नागपूरसारख्या शहरी मतदारसंघात महत्त्वाच्या उमेदवारांनी शेतीवर उपजीविका चालते असे शपथपत्रात नमूद केले आहे. मात्र रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत नाही.

ठळक मुद्देखासगी काम करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक १२ टक्के उमेदवार कोट्यधीश

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो. नागपूरसारख्या शहरी मतदारसंघात महत्त्वाच्या उमेदवारांनी शेतीवर उपजीविका चालते असे शपथपत्रात नमूद केले आहे. मात्र रामटेकमध्ये एकही उमेदवार शेतकरी नाही किंवा कृषी क्षेत्राशी निगडीत नाही. येथे सर्वाधिक उमेदवार हे खासगी काम करणारेच आहेत.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. रामटेकमध्ये एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील एकही उमेदवाराची उपजीविका शेतीवर चालत नाही. एकूण उमेदवारांपैकी एकूण ३१ टक्के उमेदवार हे एकतर खासगी काम करणारे आहेत.तर १८.७५ टक्के उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. १२.५ टक्के उमेदवार हे निवृत्तीवेतन धारक आहे. याशिवाय प्रत्येकी ६.२५ टक्के उमेदवार गृहिणी तसेच मजुरी, वकिली, गायनक्षेत्रातील आहेत.राजकीय पक्षांमधील उमेदवारांपैकी ५५ टक्के उमेदवार हे खासगी काम करणारे आहेत. तर १२.५० टक्के उमेदवारांचा व्यवसाय आहे.

३७ टक्के उमेदवार ‘बीपीएल’तब्बल ३७.५ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख किंवा त्याहून कमी आहे. तर ३१.५ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न तर २७ हजारांहून कमी आहे. अशा स्थितीत हे उमेदवार तांत्रिकदृष्ट्या ‘बीपीएल’ गटात मोडायला हवेत. १६ पैकी २ जणांनी त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्त्पन्न निरंक असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. १२.५ टक्के उमेदवारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २५ लाखांहून अधिक आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकramtek-pcरामटेक