शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; दिव्यांगांसाठी ‘पीडब्ल्यूडी अ‍ॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:27 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोईचे जावे म्हणून निवडणूक आयोगातर्फे मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्दे११ हजारावर सूचना प्राप्तमतदानासाठी प्रशासनाकडून मिळणार वाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोईचे जावे म्हणून निवडणूक आयोगातर्फे मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच दिव्यांगांना मतदान केंद्रांवर विविध सुविधा देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने यंदा पीडब्ल्यूडी हे नवीन अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपवर आतापर्यंत ११ हजार सूचना आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत. दिव्यांग मतदारांनाही मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करता येणे सोईचे होणार आहे. निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुका हे घोषवाक्य निश्चित केले आहे. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी आयोगाने पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अपंग कल्याण आयुक्तालय यांची या कामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या साहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात आली आहे. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात, असे निर्देश आयोगाकडून आलेले आहेत. या सुविधांबाबत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षणांमध्ये अवगत करण्यात आले आहे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तरावर सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत दिव्यांगांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत आणि परत घरी सोडून देण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.दरम्यान, दिव्यांगांची मतदर नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोई उपलब्ध करून घेण्यासाठी पीडब्ल्यूडी हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.हे मेबाईल अ‍ॅप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनातर्फे व्हीलचेअर, मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अ‍ॅपवर जाऊन दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी करता येईल, त्यामुळे दिव्यांग मतदारांची नेमकी संख्या लक्षात येईल आणि त्यानुसार प्रशासनाला सुविधा उपलब्ध करून देता येईल.

अशा असतील सुविधामतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक