शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : नागपुरात ६२ टक्के, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 21:08 IST

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकांतील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पाडले. प्रचंड उकाडा असतानादेखील निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार नागपुरात जवळपास ६२ टक्के मतदान झाले, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देकाही ठिकाणी ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा तांत्रिक घोळ झाल्याने मतदानाला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकांतील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पाडले. प्रचंड उकाडा असतानादेखील निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार नागपुरात जवळपास ६२ टक्के मतदान झाले, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान झाले.या दोन्ही मतदारसंघात सकाळी ७ वाजताच मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मतदार संघांमध्ये गर्दी दिसून आली. मात्र उन्हाचा कडाका वाढल्यावर दुपारी मात्र मतदान केंद्रांमध्ये मतदारांची संख्या कमी झाली होती. नागपूरमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूरमध्ये ३८.३५ टक्के तर रामटेकमध्ये ४४.५५ टक्के मतदान झाले होते. दुपारी ४ नंतर परत मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळायला लागली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागपूरमध्ये ५५.१३ टक्के तर रामटेकमध्ये ५१.७२ टक्के मतदान झाले होते.दरम्यान, मतदार याद्यांमधून नाव गहाळ होण्याचा अनुभव याही लोकसभा निवडणुकीत आला. दोन्ही मतदार संघांमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा तांत्रिक घोळ झाल्याने मतदानाला विलंब झाला. मात्र दोन्ही मतदार संघात कुठलीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतदान पार पडले. नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी व काँग्रेसचे नाना पटोले तर रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने व काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र होते.‘व्हीआयपी’ मतदारांचे मतदानदरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना उमेदवार व खा. कृपाल तुमाने, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, किशोर गजभिये यांनीदेखील मतदान केले. यावेळी मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात होती.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019