शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यात लाखावर विद्यार्थ्यांनी केले मतदानासाठी प्रोत्साहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:02 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण मतदान करू अशी ग्वाही नागपूर जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३४ हजार पालकांनी आपल्या पाल्यांमार्फत सरकारला दिली आहे.

ठळक मुद्देसंकल्पपत्र भरून दिली पावती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबविला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अ‍ॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’ (स्विप) उपक्रम राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना पालकांना मतदानासाठी प्रेरित करायचे होते. सुरुवातीला जिल्ह्यातून या उपक्रमाला केवळ दोन तालुक्यातूनच प्रतिसाद मिळाला होता. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागाकडे विचारणा केली. त्यानंतर या कामाला वेग आला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण मतदान करू अशी ग्वाही जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३४ हजार पालकांनी आपल्या पाल्यांमार्फत सरकारला दिली आहे.लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत शहर-ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून एकूण १ लाख ३४ संकल्पपत्रे भरून आणली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही सरासरीपेक्षा गेल्या काही दिवसांपासून खालावत आहे. ही मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक मतदान करतील, असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्याकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्या होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक