शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नाराज मतदारच बसपाची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:23 IST

या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज व अ़नुसूचित जातीचे मतदार प्रमुख पक्षांना नक्कीच धडा शिकवतील. हलबा समाजाची मतंही बसपाकडे येतील, असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देकॉंग्रेस, भाजपापासून मुस्लिम, एससी मतदारांचा अपेक्षाभंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेस व भाजपाच्या धोरणांमुळे अल्पसंख्यांक समाजावर नेहमीच अन्याय होत आला आहे. या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज व अ़नुसूचित जातीचे मतदार प्रमुख पक्षांना नक्कीच धडा शिकवतील. हलबा समाजाची मतंही बसपाकडे येतील, असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस व भाजपाने मुस्लिम व अनुसूचित जातींमधील मतदारांचा अपेक्षाभंग केला आहे. एका पक्षाने त्यांना ‘व्होटबँक’ समजून घेतले तर दुसऱ्या पक्षाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. या पक्षांच्या धोरणांशी नाराज असलेले मतदार हेच बसपाची ताकद बनतील, असे मत नागपूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षातर्फे मैदानात उतरलेल्या मोहम्मद जमाल यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बसपाच्या रणनीती संदर्भात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.बसपाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’अंतर्गत नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवार बनविण्यात आले आहे. देशात एकता, शांती कायम ठेवणे तसेच संविधान वाचविण्यासारख्या मुख्य मुद्यांना घेऊन बसपा मतदारांजवळ जात आहे. कॉंग्रेस व भाजपासारख्या पक्षांनी अल्पसंख्यांक व अनुसूचित जातीच्या लोकांशी चांगला व्यवहार केलेला नाही. या निवडणुकीत मतदार मतांच्या माध्यमातून याचे उत्तर देतील, असे मोहम्मद जमाल यांनी सांगितले.अल्पसंख्यांकांवर अन्याय, स्थानिक मुद्यांवर करणार प्रचारबसपा राष्ट्रीय पातळीवर प्रचारादरम्यान संविधानाच्या संरक्षण आणि सामाजिक समतेच्या मुद्यावर प्रचार करणार आहे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात शहरातील मूलभूत समस्या व स्थानिक मुद्दे यांच्यावर भर देण्यात येईल. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी मनपाच्या नगरसेवकांना स्थानिक पातळीवर निधीची कमतरता जाणवते. असे मुद्दे प्रचारात समोर आणण्यात येतील, असे मोहम्मद जमाल यांनी सांगितले.

अशी मिळाली संधीआतापर्यंत बसपातर्फे नागपुरातून ‘सोशल इंजिनिअरिंग’अंतर्गत विविध समाजाच्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी कोणत्या समाजाचे प्रतिनिधी जास्त मतं मिळवू शकतो याची पक्षाकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतरच मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मी मागील १५ वर्षांहून अधिक काळापासून बसपासोबत जुळलेला आहे. त्यामुळे मलाच संधी देण्यात आली, अशी माहिती मोहम्मद जमाल यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक