शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील लॉकडाऊनचा फटका : २५० ट्रॅव्हल्स बसेसची संख्या आली १५ ते २० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 21:54 IST

Travel buses in crises विदर्भात आणि विदर्भाबाहेर प्रवासी वाहतुकीची सेवा देणाऱ्या नागपुरातील वाहतूकदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. येथून दररोज सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या २५० वरून एकाएकी १५ ते २० वर आली आहे.

ठळक मुद्देव्यवसाय मंदावला, व्यावसायिकांना कर्जाची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भात आणि विदर्भाबाहेर प्रवासी वाहतुकीची सेवा देणाऱ्या नागपुरातील वाहतूकदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. येथून दररोज सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या २५० वरून एकाएकी १५ ते २० वर आली आहे. तब्बल आठ ते नऊ महिन्यांच्या नुकसानीनंतर आता कुठे व्यवसाय रुळावर येऊ पाहत होता. मात्र शहरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा संकट उभे ठाकले आहे.

नागपूर शहरातून मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक या लांब पल्ल्याच्या तसेच चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, गडचांदूर या शहरांसाठी वातानुकूलित आणि साध्या व ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणावर सुटतात. रोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने एकाच मार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. शहरातून साधारणत: दररोज २२५ ते २५० ट्रॅव्हल्स सुटतात. लांब पल्ल्यासाठी रोज ५० ते ६० बसेस सोडल्या जायच्या. वर्षभरापूर्वी हा व्यवसाय तेजीत होता. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनपासून या व्यवसायावर अवकळा आली आहे. यंदा पुन्हा १५ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाले. प्रवाशांची संख्या घटली. प्रशासनाने ५० टक्के प्रवासी घेऊन वाहने चालविण्याची परवानगी दिली. मात्र खर्चाला परवडत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी फेऱ्या बंद व कमी केल्या. अनेकजण नाइलाजाने ५० टक्के प्रवासी घेऊन सेवा देत आहेत. ही सेवा आता २ ते ३ टक्क्यांवर आली आहे.

व्यावसायिक चिंतेत

ऐन लग्नसराई व रंगपंचमीसारख्या सणाच्या काळात व्यवसाय थांबल्याने ट्रॅव्हल्स वाहतूकदार चिंतेत पडले आहेत. महाराष्ट्र परिवहनच्या बसेस सुरू असताना खासगी वाहतूकदारांना सेवा बंद करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप होत आहे. बँंकेचे थकीत कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार, टॅक्स कसा भरायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकारकडे मागणी करूनही मागील वर्षी नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे विनंती करण्यात अर्थ नाही, अशी नैराश्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

लॉकडाऊन लावताना प्रशासनाने जनतेचा आणि वाहतूकदारांचा विचारच केला नाही. होळीच्या सणासाठी परप्रांताहून गावाकडे जाणाऱ्या मजुरांना ट्रकने जाण्यास बाध्य करणारा हा प्रशासनाचा निर्णय आहे. ट्रॅव्हल्स बसेस अडवू नका, असा केंद्राचा आदेश असतानाही अडवणूक होत आहे.

महेंद्र लुले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-बस वाहतूक महासंघ

५० टक्के प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी असली तरी परवडण्यासारखे नाही. प्रवाशांची गैरसोय टळावी यासाठी आम्ही नाईलाजाने सेवा देत असलो तरी आमच्या संकटाचा विचार प्रशासनाने करावा.

 विलास टिपले, खासगी प्रवासी वाहतूकदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPublic Transportसार्वजनिक वाहतूक