शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पस सिलेक्शनवर लॉकडाऊनचा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 14:11 IST

लॉकडाऊनच्या काळातही घरात बसलेल्या विद्यार्थ्यांना एक आशादायक बातमी आहे, कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या नोकऱ्या सुरक्षित आहेत.

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळातही घरात बसलेल्या विद्यार्थ्यांना एक आशादायक बातमी आहे, कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या नोकऱ्या सुरक्षित आहेत. अद्यापतरी कुण्या कंपनीने कॉलेज किंवा संस्थांच्या माध्यमातून दिलेल्या नोकरीची आॅफर परत घेतलेली नाही, उलट आॅनलाईन मुलाखती घेऊन निवड सुरू आहे.साधारणत: कंपन्या नोव्हेंबरपासून संस्था व महाविद्यालयांमध्ये जाऊन कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात. प्राप्त माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात १६३ कंपन्यांनी नागपूरसह परिसरातील कॅम्पसमध्ये मुलाखती घेतल्या होत्या. बहुतेक कंपन्या भारतीय आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने नोकºया मिळाल्या आहेत. इंजिनियरिंगच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व आॅटोमोबाइल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक रोजगार आणि पॅकेज मिळते. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीही संधी आहे. मात्र आॅफर लेटर मिळण्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू झाले. अनेकांच्या मुलाखती राहून गेल्या. त्यामुळे चिंतेचे सावट होते. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांमध्ये रोजगार कपात सुरु असून नवे रोजगार जाण्याचीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे चिंता वाढली असली तरी ही आशादायक बातमी आहे.ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंटशी संबंधित डॉ. मुजाहिद सिद्दीकी यांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे उत्पादन ठप्प आहे. मात्र ते हटताच काम पुन्हा सुरू होईल. भविष्यात भारतीय उत्पादनांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाढत्या मागाणीसोबत उत्पादनातही वेग आणावा लागेल. अशा वेळी कंपन्यांना उत्तम व प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही कंपन्या प्रतिभाशाली युवकांचे मनुष्यबळ गमावू इच्छित नाही.परीक्षेचा होऊ शकतो अडथळालॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या परीक्षा खोळंबल्या आहेत. लॉकडाऊन हटताच आधी परीक्षा द्याव्या लागतील. परीक्षा होऊन निकाल लागत नाही तोवर कंपन्या सेवेत समाविष्ट करू शकत नाहीत. त्यामुळे लांबलेली परीक्षा विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. देशभारतील विद्यापीठांमध्ये परीक्षांसंदर्भात समान स्थिती आहे. लॉकडाऊन संपताच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी नागपूर व अमरावतीमध्ये खाजगी विद्यापीठे आणि स्वायत्त संस्था विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन परीक्षा घेत आहेत. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस