शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘वज्रमूठ’ला स्थानिकांचा विरोध कायमच, मंचाच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात

By योगेश पांडे | Updated: April 12, 2023 16:58 IST

Nagpur News सद्भावना नगरातील दर्शन कॉलनीतील मैदानात ‘वज्रमूठ’ सभा घेण्यावर महाविकास आघाडी ठाम असून तेथील स्थानिक नागरिक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र विरोध कायम आहे.

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्भावना नगरातील दर्शन कॉलनीतील मैदानात ‘वज्रमूठ’ सभा घेण्यावर महाविकास आघाडी ठाम असून तेथील स्थानिक नागरिक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र विरोध कायम आहे. या सभेसाठी मैदानावर मंचदेखील उभारण्यात आला असून तेथे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे. २४ तास मैदानावर लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असून २० पोलीस दिवसरात्र बंदोबस्तावर आहेत.

दर्शन कॉलनीत १६ एप्रिल रोजी महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेवरून चांगलेच राजकारण पेटले आहे. पुर्व नागपुरचे आ.कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी या सभेला देण्यात आलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी नासुप्रकडे केली. स्थानिक नागरिकांनी आंदोलनदेखील केले. भाजपच्या शहराध्यक्षांचा या मैदानावर सभा घेण्यास आक्षेप नसताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र विरोध दर्शविला. हे खेळण्याचे मैदान असून ते सभेमुळे खराब होईल, असा दावा नागरिकांकडून करण्यात आला. तर महाविकासआघाडीचे नेते तेथेच सभा घेण्यावर ठाम आहेत.

या पार्श्वभूमीवर सभेसाठी तयारी सुरू झाली असून मंच उभारण्यात आला आहे. मात्र कुठलीही अनुचित घटना होऊ नये व कायदा-सुव्यवस्था खराब होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसा १० व रात्री १० पोलीस कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले आहे. लवकरच बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती पोलीस विभागातील सूत्रांनी दिली.

बुधवारी नागरिकांनी काढली रॅलीदरम्यान, वज्रमूठ सभेला विरोध करण्यासाठी बुधवारी स्थानिक नागरिकांनी परिसरात जनजागृती रॅली काढली. क्रीडा मैदान बचाव समितीतर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. यात स्थानिक नागरिकांसह भाजपचे काही पदाधिकारीदेखील उपस्थित होते. कुठल्याही परिस्थितीत रॅली होऊ देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी यावेळी बोलून दाखविली.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण