शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

मंत्रिपदासाठी लॉबिंग

By admin | Updated: October 30, 2014 00:50 IST

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेतील. या मंत्रिमंडळात उपराजधानीतून कुणाची वर्णी लागेल,

खोपडे, बावनकुळे, देशमुख स्पर्धेत : दलित नेतृत्व म्हणून मानेंचाही विचार नागपूर : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेतील. या मंत्रिमंडळात उपराजधानीतून कुणाची वर्णी लागेल, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख व डॉ. मिलिंद माने यांची नावे स्पर्धेत आहेत. ‘मिनीमम गव्हर्नमेंट, मॅक्झीमम गव्हर्नन्स’, असे सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. त्यामुळे फडणवीस यांचे मंत्रिमंडळही लहानच असेल, अशी शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्रिपद नागपूरला मिळाल्याने नागपुरातून मंत्रिमंडळात किती जणांना स्थान मिळेल, हाही एक प्रश्नच आहे. असे असले तरी नागपुरातून किमान दोन जणांची वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिपदे देताना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सामाजिक निकषांचा आधार घेतला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.तेली समाज बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने झुकला आहे. पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे व कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही आमदार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्यांनी ‘तुम्ही निवडून आणा, आम्ही लालबत्ती देतो, असे आवाहन मतदारांना केले होते. खोपडेंनी दुसऱ्यांदा विजय नोंदविला, तर बावनकुळे यांनी हॅट्ट्रिक मारली आहे. या दोन नेत्यांपैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुणबी समाजातून असलेले सुधाकर देशमुख हे सिनीअर आहेत. दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रचारप्रमुख तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. मिलिंद माने हे दलित समाजातील नेतृत्व आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपला डॉ. माने यांच्या रूपात एक सुशिक्षित व आंबेडकरी चळवळीत पकड असलेला दलित चेहरा मिळाला आहे. भविष्यातील भाजपासमोरची आव्हाने विचारात घेता, डॉ. माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)