शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जवाटप बंद होणार

By admin | Updated: August 5, 2016 03:13 IST

जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांचा दुवा समजल्या जाणाऱ्या गटसचिवांना जुलैपर्यंत १० महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गटसचिव सामूहिक राजीनामा देणार : जिल्हा बँकेकडे पाच कोटी थकीत मोरेश्वर मानापुरे नागपूर जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांचा दुवा समजल्या जाणाऱ्या गटसचिवांना जुलैपर्यंत १० महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीनंतर जमा होणाऱ्या व्याजातून त्यांना २ टक्के कमिशनपोटी मिळणारे सुमारे ५ कोटी रुपये जिल्हा बँकेकडे थकीत आहे. त्यानंतरही त्यांना वेतन न मिळणे, ही बँकेसाठी लाजिरवाणी बाब आहे. बँकेच्या असहकार धोरणामुळे ४० गटसचिव सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा बँकेकडे ५ कोटी थकीत गटसचिवांना सहकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत कार्यरत जिल्हा सुपरव्हिजन को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून वेतन मिळते. कर्ज वसुलीतून मिळणाऱ्या व्याजाची २ टक्के रक्कम जिल्हा बँकेकडून सोसायटीला मिळते. त्याद्वारे गटसचिवांना वेतन मिळते. उपलब्ध आकडेवारीनुसार ३१ मार्च २०१३ पर्यंत सोसायटीला जिल्हा बँकेकडून ३.५ कोटी रुपये घेणे होते. त्यानंतर ही रक्कम ३१ मार्च २०१६ पर्यंत ५ कोटींवर गेली आहे. निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून जिल्हा बँकेने सोसायटीला ५ कोटी रुपये न दिल्याने गटसचिवांना १० महिन्यांचे वेतन मिळाले नाही. जिल्हा बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळतो, मग आम्हाला का नाही, अशी त्यांची खंत आहे. पगार नाही तर काम नाही, अशी ठोस भूमिका गटसचिवांनी घेतली आहे. गटसचिवांमध्ये असंतोष कर्जवाटप, वसुली, वार्षिक ताळेबंदासह बँकेची अनेक कामे गटसचिवांच्या माध्यमातून केली जातात. ते बँकेचा कणा आहेत. वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप आणि त्यांच्याकडून कर्ज वसुली होणार नाही. त्यामुळे जिल्हा बँकेची संपूर्ण यंत्रणा कोलमडणार आहे. जिल्हा बँकेचे कर्मचारी गटसचिवांची कामे करण्यास तयार नाहीत. बँकेला सुगीचे दिवस येण्यासाठी गटसचिवांना थकीत वेतन देण्याची नितांत गरज आहे. अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर ५ आॅगस्टच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आहे. एका गटसचिवाकडे १५ संस्थांचा कार्यभार पूर्वी गटसचिवांची संख्या ३५२ असताना एकाकडे एक किंवा दोन संस्थांचा कार्यभार असायचा. पण आता केवळ ४० गटसचिव कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे १५ ते १६ संस्थांचा कार्यभार आहे. शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी गावे पालथी घालताना त्यांना दररोज ६० ते ७० कि़मी. अंतर कापावे लागते. हे शक्य नसतानाही त्यांनी कठोर परिश्रमाने १० कोटींपर्यंत कर्जवाटप केले. त्याबदल्यात त्यांना वेतन मिळालेले नाही. उस्मानाबाद येथील गटसचिवाने आठ महिन्याचे वेतन न मिळाल्याने २८ जूनला आत्महत्या केल्याचे उदाहरण ताजे आहे. वेतन देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन जून महिन्यापर्यंत नऊ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने गटसचिवांनी कर्जवाटप करण्यास नकार दिला. शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेऊन जूनच्या अखेरच्या आठवड्यात आमदार सुनील केदार, सहकार व जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गटसचिवांची बैठक घेतली. ३१ जुलैपर्यंत पीक कर्जवाटप करा, ४ आॅगस्टपर्यंत वेतन देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी गटसचिवांना दिले होते. पूर्वी ३५२ आणि आता कार्यरत असलेल्या ४० गटसचिवांनी दिवसरात्र परिश्रम घेत १३ तालुक्यातील शेतकऱ्यांना १० कोटींचे कर्जवाटप केले. आश्वासनानुसार गटसचिवांना वेतन मिळालेले नाही. ४३ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट शासनाने यावर्षी शेतकऱ्यांना ४३ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी गटसचिव महत्त्वपूर्ण दुवा आहे. अपुऱ्या संख्येमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सत्य बाब अशी की, जिल्हा बँकेने कर्जवाटपाचे नियम कठोर केले आणि उशिरा वाटप सुरू केले. एवढेच नव्हे तर चुकीचे धोरण राबवून एक लाखावर कर्ज देण्यास बँकेने प्रतिबंध लावले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास उडाला आणि त्यांनी कर्जासाठी अन्य बँकेकडे धाव घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरू झालेली जिल्हा बँक सुस्थितीत येण्यापूर्वीच सहकार विभाग आणि बँकेत कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एककल्ली कारभारामुळे बंद तर होणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.