शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उद्योजकांना कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:38 IST

सुक्ष्म, लघु आणि मध्यम समूहातील अन्न प्रक्रिया उद्योगांना पंतप्रधान शंभर दिवस उपक्रमांतर्गत स्टेट बँकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतगृह सभागृहात बुधवारी उद्यमी ऋण जागरूकता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते ‘एमएसएमई ५९ मिनिटांत कर्ज’ या योजनेंतर्गत २५ उद्योजकांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप : ऑनलाईन योजनांची माहिती

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुक्ष्म, लघु आणि मध्यम समूहातील अन्न प्रक्रिया उद्योगांना पंतप्रधान शंभर दिवस उपक्रमांतर्गत स्टेट बँकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतगृह सभागृहात बुधवारी उद्यमी ऋण जागरूकता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते ‘एमएसएमई ५९ मिनिटांत कर्ज’ या योजनेंतर्गत २५ उद्योजकांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.स्टेट बँकेतर्फे मुद्रा प्रधानमंत्री उद्योजकता आणि इतर विविध योजनेंतर्गत २५ उद्योजकांना सहा कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. एमएसएमई यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने कर्ज वितरित करण्यात आले. यावेळी निवासीउपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, एमएसएमईचे सहायक संचालक किशोर काळकर, बँकेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार, सचिन फडणवीस, अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे, मनोज तिवारी, डिक्कीचे निश्चय शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक सुरेश विंचूरकर, विजय अगस्ती, जीएसटीचे अधीक्षक सुरेश रायलू, ईएसआयसीचे शाखा व्यवस्थापक शिरीष मुठाळ उपस्थित होते.उद्योजकाने कर्ज कसे घ्यावे, याबाबत असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेची माहिती आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती उद्योजकांना देण्यात आली. तसेच यावेळी उद्योजकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. एमएसएमईअंतर्गत २ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू झालेले योजनेंतर्गत विविध बँकांद्वारे नागपूर जिल्ह्यात उद्योजकांसाठी मेळावे शंभर दिवस आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विविध बँकांचे अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयbankबँक