नागपूर : स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात अहोरात्र धावताना निरोगी आयुष्य जगणे, हा सर्वांचा हक्क आहे. जीवन म्हणजे शरीर व मन यांची अविभाज्य सांगड. त्यामुळे कुठलाही आजार या दोघांनाही एकावेळी ग्रासतो. हा व्यापक दृष्टीकोन ठेवून प्रत्येक रुग्णाचा सखोल अभ्यास केला तर दुर्धर आजारसुद्धा परिणामकारकपणे दुरुस्त करता येऊ शकतात, असे विचार ‘वेद होमिओपॅथी क्लिनिक’च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कमलेश काकडे, एमडी (होमिओपॅथी) यांनी व्यक्त केले. मिराज हाईट्स, गांधीनगर, अंबाझरी रोड, नागपूर येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन शाखेत जागतिक दर्जाची आणि अत्याधुनिक संशोधनावर आधारित होमिओपॅथी चिकित्सा मध्य भारतात उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचवेळी ‘द अदर साँग अकॅडमी’, नागपूरचे उद्घाटनही करण्यात आले. ही संस्था नागपूर व विदर्भातील होमिओपॅथी डॉक्टर व विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजन संकरन यांनी दिली. डॉ. राजन संकरन होमिओपॅथीचे ख्यातनाम डॉक्टर, विचारवंत व संशोधक आहेत. (वा.प्र.)
निरोगी आयुष्य जगणे सर्वांचा मूलभूत हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST