शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

‘कॅनव्हास’वर माणसांना जिवंत करणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:12 AM

नागपुरातील युवा कलावंत पराग सोनारघरे याने कॅनव्हासवर साकारलेल्या कलाकृती इतक्या बोलक्या आहेत, की त्या बघितल्यावर आपण नक्कीच म्हणू, खरंच या पेंटिंग आहेत?

ठळक मुद्देपराग सोनघरेची किमया आकर्षक व दर्जेदार ‘पोर्ट्रेट’ व ‘पेंटिंग’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही कलेला एका आयामाच्या बाहेर न्यायचे असेल, त्यात कलावंताच्या वेगळेपणाचा ठसा उमटवायचा असेल, तर त्या कलेप्रति कलावंताचे समर्पण असले पाहिजे. तेव्हाच तो कलावंत एका वेगळ्या शैलीत रूपात त्या कलाकृतीला रसिकांपुढे मांडून, वाहवा मिळवू शकतो. नागपुरातील युवा कलावंत पराग सोनारघरे याने आपले आयुष्य कॅनव्हासवर झोकून दिले. त्याने कॅनव्हासवर साकारलेल्या कलाकृती इतक्या बोलक्या आहेत, की त्या बघितल्यावर आपण नक्कीच म्हणून खरंच या पेंटिंग आहेत?बालपणापासून पेंटिंगची आवड परागला होती. सातव्या वर्गात असतानाच त्याने ‘बीएफए’ करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीनंतर त्याने चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याला कमर्शियल या अप्लाईड आर्टमध्ये बीएफए करायचे होते. परंतु त्याला पेंटिंगमध्ये प्रवेश मिळाला. कला क्षेत्रात बॅचलर डिग्री मिळविल्यानंतर परागने एमएस युनिव्हर्सिटी बडोदा येथून मास्टर आॅफ व्हिज्युअल आर्टस्चे शिक्षण घेऊन प्रॅक्टिस सुरू केली. आज परागने रिकाम्या कॅनव्हासवर साकारलेले चित्र बघितल्यानंतर आपल्याला परागचे कलेप्रति असलेले समर्पण लक्षात येईल.परागने आपल्या कलेला वेगळा आयाम दिला. त्याने प्रोजेक्टेड इमेज न करता रिअल इमेज साकारण्यावर भर दिला. परागच्या पेंटिंग, पोर्ट्रेट पाहिल्यावर नक्कीच वाटते की हुबेहुब व्यक्ती आपल्यापुढे उभा आहे. परागच्या पेंटिंग दिल्ली, मुंबई, गोवा, अमेरिका, कोरिया, सिंगापूर येथे प्रदर्शित झाल्या आहेत.

या विषयावर काम करतो परागपराग मानवी जीवनाचा प्रवास पेंटिंगच्या माध्यमातून व्यक्त करू इच्छितो. बहुतांश पेंटिंगमध्ये व्यक्तीची प्रोजेक्टेड इमेज दाखविली जाते. पण परागच्या पेंटिंगमध्ये व्यक्ती जसा आहे, तसाच कॅनव्हासवर साकारतो. त्याच्या पेंटिंगमध्ये इतके बारकावे आहेत की, त्याची त्वचा, केस, त्याच्या चेहऱ्यावरील भाव जराही पेंटिंग केलेली आहे असे वाटत नाही. त्याचा पेंटिंगचा विषय हा कॉमन मॅन व उपेक्षित वर्गाच्या जीवनावर आधारित आहे.

परफॉर्मन्स आर्टचीही आवडत्याचबरोबर परागने वेगवेगळ्या शहरात परफॉर्मन्स आर्ट्ससुद्धा केले आहे. त्यांनी नागपूर, भुवनेश्वर, बडोदा, दिल्ली येथे विविध परफॉर्मन्स आर्ट केले आहे. त्याचा या आर्टलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भुवनेश्वरमध्ये त्याने पटचित्र पेंटरच्या सोबत शरीरावर पेंटिंग करून शहरात वॉक केला होता. त्याचसोबत इंटरनॅशनल आर्टिस्ट असो. दिल्ली व बडोदा येथेसुद्धा वेगवेगळे परफॉर्मन्स आर्ट केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक