शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिप गंभीर समस्या

By admin | Updated: May 25, 2016 02:42 IST

लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार समाजातील एक गंभीर समस्या म्हणून पुढे येत असल्याचे सांगून...

विजया रहाटकर : राज्य महिला आयोगाला वाटतेय चिंतानागपूर : लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार समाजातील एक गंभीर समस्या म्हणून पुढे येत असल्याचे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. रविभवन येथे मंगळवारी विभागीय जनसुनावणीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलींच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मुलांवर आंधळेपणाने विश्वास ठेवल्यामुळे आतापर्यंत अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. जनसुनावणीत अशी सात प्रकरणे पुढे आल्याची माहिती रहाटकर यांनी दिली. महिलांवरील हिंसाचारावरही त्यांनी विचार व्यक्त केले. महिलांसंदर्भातील कायदे सक्षम आहेत, पण मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी महिला बरोबर असतात असे म्हटले जाऊ शकत नाही. मात्र, बहुतांश प्रकरणांत महिलांची चूक नसते. माणसाने माणसाला माणूस म्हणून बघितल्यास ही समस्या कायमची संपून जाईल अशी भूमिका रहाटकर यांनी मांडली.नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या आठ जिल्ह्यासांठी मंगळवारी जनसुनावणी झाली. आयोगाने एकूण ५८ प्रकरणे ऐकली. त्यात ३० कौटुंबिक हिंसाचार, ९ सामाजिक, ५ मालमत्ताविषयक, ३ कामाच्या ठिकाणी छळ तर, ११ इतर प्रकरणांचा समावेश आहे. यातील ५१ प्रकरणे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. भंडारा येथील ४ तर, गोंदिया, अकोला व गडचिरोली येथील प्रत्येकी १ प्रकरण आहे. अमरावती, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील एकही प्रकरण आयोगापुढे आले नाही. यासाठी विविध कारणे असू शकतात असे स्पष्टीकरण रहाटकर यांनी दिले. जास्तीतजास्त महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोगातर्फे आता जिल्हास्तरीय सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीस येत्या आॅगस्टपासून सुरुवात होईल. ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेतली जात आहे. सुनावणीत तक्रार मांडण्यासाठी पूर्वसूचना देण्याची गरज नाही अशी माहिती रहाटकर यांनी दिली. (प्रतिनिधी)त्या प्रकरणात पोलिसांना निर्देशमनसरजवळच्या कांद्री खाण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणाचा सखोल तपास, दोषारोपपत्र दाखल करणे इत्यादीबाबत पोलिसांना आयोगातर्फे आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. अशाप्रकरणात निर्णय लवकर लागल्यास गुन्हेगारांवर वचक निर्माण करता येतो. पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, असे रहाटकर यांनी सांगितले.