शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इनमधील प्रेयसीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: March 16, 2024 22:54 IST

युवकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : रुग्णालयात उपचारासाठी न नेता सोडले आईकडे

नागपूर : लिव्ह इनमध्ये राहणाºया प्रेयसीला मारहाण करून तिला उपचारासाठी न नेता आईच्या घरी आणून सोडले. आईने युवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

शहबाज उर्फ समीर फैतुल्ला शेख (२७, रा. शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया २७ वर्षीय युवतीशी मागील चार ते पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह इनमध्ये एकमेकांसोबत राहत होते. दरम्यान कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता त्यांच्यात भांडण झाले. भांडणात युवकाने तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात तिच्या पायाला जबर दुखापत झाली. युवकाने तिला परिसरातील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. दरम्यान दुखापत जास्त असल्याने डॉक्टरांनी त्याला युवतीला दुसºया रुग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु आरोपी शहबाजने उपचारासाठी पैसे नसल्याने तिला तिच्या आईकडे सोडले. तिच्या आईने तिला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला. उपचारासाठी उशीराने रुग्णालयात भरती केल्यामुळे युवतीचा मृत्यु झाल्याची चौकशीत समोर आली. त्यामुळे मृत युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी शहबाजविरुद्ध कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी