शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी हायकोर्टात ४७ भूखंडांची यादी सादर; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे प्रतिज्ञापत्र

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 8, 2024 18:42 IST

मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी शहराच्या चारही बाजूने पाच एकर व त्यापेक्षा जास्त आकाराचे ४७ सरकारी भूखंड शोधण्यात आले आहेत.

नागपूर: मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी शहराच्या चारही बाजूने पाच एकर व त्यापेक्षा जास्त आकाराचे ४७ सरकारी भूखंड शोधण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये या भूखंडांची तालुकानिहाय यादी सादर केली.

शहरात ९० हजारावर मोकाट श्वान आहेत. ही संख्या लोकसंख्येच्या ३ टक्के आहे. मोकाट श्वानांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महानगरपालिका कायद्यानुसार मोकाट श्वानांना विशिष्ठ ठिकाणी बंदिस्त ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, महानगरपालिकेकडे एवढ्या श्वानांना ठेवण्यासाठी भूखंड उपलब्ध नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला शहराच्या चारही बाजूने प्रत्येकी पाच एकराचे भूखंड शोधण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी भूखंडांची यादी सादर केली. तसेच, पुढील प्रक्रियेची माहिती देताना, महानगरपालिकेने या भूखंडांचे निरीक्षण करून सुयोग्य भूखंड निवडावे, जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार अर्ज सादर करून त्या भूखंडाची मागणी करावी, त्यानंतर संबंधित अर्जावर कायदेशीर कार्यवाही करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

पुढील सुनावणी २९ फेब्रुवारीलान्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर येत्या २९ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. शहरातील मोकाट श्वानांचा हैदोस थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्या, मोकाट श्वानांनी जखमी केलेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी इत्यादी मागण्यांकरिता व्यावसायिक विजय तालेवार व मनोज शाक्य यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदौस मिर्झा तर, सरकारतर्फे ॲड. दीपक ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :nagpurनागपूरdogकुत्रा