शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

अंधाराशी युद्ध करणारे ‘लाईनमन’

By admin | Updated: June 12, 2014 01:14 IST

बुधवारचा दिवस. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याने दुपारी १ वाजतानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीकडून मिळणारे उत्तर.

प्रतिकूल स्थितीत काम : सायकलवर ‘पेट्रोलिंग’कमल शर्मा - नागपूर बुधवारचा दिवस. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. देखभाल-दुरुस्ती सुरू असल्याने दुपारी १ वाजतानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वीज वितरण कंपनीकडून मिळणारे उत्तर. महावितरण या दिवशी नेमके करते तरी काय, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत चमू’ थेट दुरुस्तीच्या ठिकाणी पोहोचली. तेथे ‘लाईनमन च्या कामाच महत्त्व कळलं. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचे अंधाराशी युद्ध सुरु होते.वयाची पन्नासी पार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सफाईने खांबावर चढताना आणि उतरताना पाहिल्यावर त्यांच्याशी चर्चा केल्यावर तेच महावितरणचा आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट झाले. विजेचे खांब लावतानाच ग्राहकांच्या घरी २४ तास वीजपुरवठा होतो किंवा नाही याची खबरदारी घेतानाच पुरवठा खंडित झाल्यास त्यामागची कारणे शोधून तो सुरळीत करण्याची जबाबदारीही या कर्मचाऱ्यांचीच असते. कधी सायकलवर तर कधी दुचाकीवर ते त्यांच्या भागात ‘पेट्रोलिंग’ करतात. अनेक वेळा जीव धोक्यात घालून त्यांना खांबावर चढावे लागते. महावितरणमधील ६० टक्के ‘लाईनमन’ मधुमेहाने पीडित आहेत. बहुतांश जणांना अर्धांगवायूचा झटका आला आहे.कामाची वेळ अनिश्चितबेसा पॉवर हाऊसमध्ये काम सुरू होते. तेथे ‘लोकमत चमू’ पोहोचली. तेथे १२ पेक्षा अधिक कर्मचारी फिडर दुरुस्तीचे काम करीत होते. सेवानिवृत्तीच्या जवळ पोहोचलेले उमाकांत कोलते हे यापैकीच एक. ते म्हणाले की, कामाची वेळ निश्चित नाही. कामाची वेळ जरी आठ तास असली तरी, आपात्कालीन स्थितीत कधी १२ तर कधी १६ तास काम करावे लागते. उशिरा रात्री कॉल आल्यावर १५ मिनिटात संबंधित ठिकाणी पोहोचावे लागते. कुटुंबीयांनाही याची सवय झाली आहे.अपघाताची चिंता नाहीदुरुस्तीचे काम करताना अनेक वेळा धोका संभवतो. विजेचा धक्काही बसतो. पण त्याची चिंता करत नाही. वीज पुरवठा सुरळीत करणे यालाच कर्मचाऱ्यांचे प्राधान्य असते, असे सदाशिव मानकर म्हणाले.वीज ग्राहक आमचे कुटुंबीबेसा येथे काम करणारे प्रशांत आकरे म्हणाले की, वीज ग्राहकांना आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यच मानतो. ते अंधारात राहू नये, असेच आमचे प्रयत्न असतात. विविध सोयी आणि सुविधांच्याबाबतीत आम्ही सरकारशी लढतो. पण ग्राहकांना सेवा देताना याचा विचार कधीच करीत नाही.