तसेच सलग तीन महिने धान्याची उचल न करणाऱ्या शिधापत्रिकाधारक ग्राहकांची शिधापत्रिका २०२१ नंतर चौकशीअंती तात्पुरती व त्यानंतर कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. कळमेश्वर तालुक्यात ७५ स्वस्त धान्य दुकाने असून ४२११ अंत्योदय गट लाभार्थी तर १९८० प्राधान्य गट लाभार्थी आहेत. रेशन कार्ड नुसार ९८ टक्के सीडिंग झाले असून व्यक्तिगत ८८ टक्के सेटिंग झालेले आहे. ३१ जानेवारीपर्यंत १०० टक्क्यांपर्यंत सीडिंग होणे आवश्यक आहे. न झाल्यास पुढील महिन्यापासून धान्य पुरवठा बंद करण्यात येईल. याकरिता लाभार्थ्यांनी रेशन दुकानात जाऊन आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक समाविष्ट करून केवायसी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी निकिता साकळे व अन्न पुरवठा निरीक्षक बालाजी घावस यांनी केले आहे.
आधार लिंक करा ३१ जानेवारीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:11 IST