शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अखंड भारताची ज्योत मनात पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST

नागपूर : इतिहासात आतापर्यंत भारतमातेला २४ वेळा खंडित करण्याचे पाप झाले आहे. हे देशवासीयांनी विसरून चालणार नाही; ज्या-ज्या वेळी ...

नागपूर : इतिहासात आतापर्यंत भारतमातेला २४ वेळा खंडित करण्याचे पाप झाले आहे. हे देशवासीयांनी विसरून चालणार नाही; ज्या-ज्या वेळी या देशावर आक्रमणे झालीत, त्या-त्या वेळी या देशातील युवकांनी प्राणपणाने या देशासाठी आपली आहुती दिल्याचा आपला तेजस्वी इतिहास आहे. त्यामुळेच आम्हा युवकांच्या धर्म निष्ठेने, ध्येयाने व प्रयत्नांतील सातत्याने अखंड भारताचे स्वप्न साकार होईल व ते केल्याशिवाय या देशातील युवक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन युवा वक्ते ऋग्वेद मदन सेनाड यांनी केले आहे.

अखंड भारत संकल्प दिनाच्या पर्वावर आयोजित जाहीर सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

स्वतंत्रता अमृत महोत्सव समितीतर्फे झिंगाबाई टाकळी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकरराव वानखेडे, अल्केश येरखेडे व मनोज सिंह मंचावर उपस्थित होते.

सेनाड म्हणाले, अखंड भारत हे देशातील कोट्यवधी नागरिकांचे स्वप्न असून, ते साकार करण्यासाठी युवकांच्या मनात राष्ट्रभक्ती व धर्माभिमान जागवणे आवश्यक आहे. आजची भरकटत चाललेली युवा पिढी व आपल्या संस्कृतीशी होत चाललेली फारकत हे देशासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. प्रास्ताविक मनोज सिंह यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन प्रणव मालवीय यांनी केले. सभेपूर्वी अखंड भारत युवक रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर अखंड भारत साकार करण्याचा संकल्प करण्यात आला व सामूहिक वंदेमातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी कमलेश डोंगरे, रूपेश सोनटक्के, पवन चरडे, रत्नाकर ठाकरे, अभिजित टेकाडे आदींनी परिश्रम केले.