शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आता ट्रॅफिक सिग्नल्सवर लागेल निळा दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 10:06 IST

शहरातील ट्रॉफिक सिग्नल्सवर आता लाल, पिवळ्या व हिरव्या दिव्यासोबत निळा दिवा लावण्यात येणार आहे. निळा दिवा सुरू होताच सर्व वाहने बंद करावी लागणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव विचाराधीनवाहने बंद ठेवावी लागतील

रिता हाडके ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील ट्रॉफिक सिग्नल्सवर आता लाल, पिवळ्या व हिरव्या दिव्यासोबत निळा दिवा लावण्यात येणार आहे. निळा दिवा सुरू होताच सर्व वाहने बंद करावी लागणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.ट्राफिक सिग्नलवर लाल दिवा वाहतूक थांबविण्यासाठी तर, हिरवा दिवा वाहतूक सुरू करण्यासाठी वापरला जातो. पिवळा दिवा क्रॉसवॉकपूर्वी सुरक्षित थांबण्याचे व शक्य असल्यास सावधानीपूर्वक पुढे जाण्याचे संकेत देतो. निळा दिवा वाहने बंद करण्याचे संकेत देणार आहे. लाल दिवा सुरू होताच काही सेकंदानंतर निळा दिवा सुरू होईल. दरम्यान, वाहन चालकांना काही वेळाकरिता वाहने बंद ठेवावे लागतील. त्यामुळे पेट्रोलची बचत व पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण होईल. वाहतूक विभागाने निळ्या दिव्याचा प्रस्ताव गत आॅक्टोबरमध्ये महापालिकेला सादर केला. प्रस्ताव मंजूर होताच ट्रॅफिक सिग्नल्सवर निळे दिवे लावले जातील.

पर्यावरणाचे संरक्षण होईलनिळा दिवा सुरू होताच वाहने बंद ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. त्यातून पर्यावरणाचे संरक्षण होईल. सध्या लाल दिवा सुरू झाल्यानंतर वाहतूक थांबते, पण वाहने बंद केली जात नाहीत. त्यामुळे विनाकारण प्रदूषण होते व पेट्रोलचेही नुकसान होते.निळा दिवा आवश्यकपर्यावरण संरक्षण व इंधन बचतीसाठी ट्रॅफिक सिग्नल्सवर निळा दिवा लावणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होताच ट्रॅफिक सिग्नल्सवर निळे दिवे लावले जातील.- राजतिलक रोशन,उपायुक्त, वाहतूक विभाग, नागपूर.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा