शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात क्रिकेट बुकींनी घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:55 IST

आयपीएलवर लगवाडी-खयवाडी करणाऱ्या बुकींकडून उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावला गेल्याने एका वूडवूल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ताराचंद रामअवतार अग्रवाल (वय ५६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहत होते.

ठळक मुद्देलाखोंची रक्कम हरल्यानंतर बुकींचा तगादा : व्यावसायिकाने लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयपीएलवर लगवाडी-खयवाडी करणाऱ्या बुकींकडून उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावला गेल्याने एका वूडवूल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ताराचंद रामअवतार अग्रवाल (वय ५६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहत होते.अग्रवाल हे कॉटन मार्केटमध्ये वूडवूल विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या बाजूलाच चंदन खत्री ऊर्फ सोनी (रा. कपिलनगर, जरीपटका) याचेही दुकान आहे. त्यामुळे अग्रवाल आणि सोनीत मैत्री होती. सोनीचा कामठीतील रवी नामक मित्र लॉटरी सेंटरच्या नावाआड क्रिकेट बेटिंग करतो. बुकी रवी आणि सोनी या दोघांनी अग्रवाल यांना क्रिकेट सट्ट्याचे व्यसन लावले. आयपीएलच्या सिझनमध्ये अग्रवाल यांनी रवी तसेच सोनीच्या माध्यमातून क्रिकेटवर लाखोंचा सट्टा लावला. ते लाखोंची रक्कम हरले. त्यानंतर काही दिवस त्यांनी उधारित सट्टा लावला. त्यातही ते हरले. उधारीची चार ते पाच लाखांची रोकड मिळावी म्हणून आरोपी सोनी आणि रवीने अग्रवाल यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावला होता. फोनवरून ते धमकीही देत होते. त्यामुळे अग्रवाल यांची मानसिक अवस्था बिघडली. ते पाहून मुलांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी क्रिकेट सट्ट्यात रक्कम हरल्याचे सांगून आरोपींकडून होणारा त्रासही सांगितला. मुलाने त्यांना धीर दिला. या पार्श्वभूमीवर, २७ मे रोजी सकाळी अग्रवाल कुटुंबातील सदस्य बाहेर गेले. घरात कुणी नसल्याचे पाहून ताराचंद अग्रवाल यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रात्री कुटुंबातील सदस्य परत आले तेव्हा त्यांना ताराचंद अग्रवाल गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्येचे सविस्तर कारण लिहिले होते. त्यावरून ताराचंद अग्रवाल यांचा मुलगा दीपक याने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली प्रकरण रेंगाळत ठेवल्यानंतर गुरुवारी सोनी आणि रवीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिसांनी आरोपींची पूर्ण नावे आणि सविस्तर माहिती देण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे.सट्टेबाजीत अनेक उद्ध्वस्तनागपुरात बुकींची बजबजपुरी झाली आहे. गल्लीबोळात क्रिकेट सट्ट्याची खयवाडी-लगवाडी केली जाते. हायटेक अड्ड्यांसोबत छोट्या छोट्या सदनिका आणि पानटपरीवर बसून छोटे बुकी क्रिकेटचे बेटिंग करतात. आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या आडही क्रिकेट सट्ट्याची दुकानदारी चालवली जाते. ओळखीच्या ग्राहकाला खास करून व्यापारी, व्यावसायिकांना क्रिकेटची खयवाडी करणारे बुकी लाखोंची उधारी देतात. त्यानंतर उधारीसाठी त्यांचे घर, स्थावर मालमत्ता गुन्हेगारांमार्फत ताब्यात घेतात. जीवे मारण्याची, बदनामी करण्याची धमकी देतात. ताराचंद अग्रवाल यांच्या बाबतीत असेच झाले. मोठी रोकड हातून गेल्याने त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. त्यात पुन्हा चार ते पाच लाखांची रोकड मिळावी म्हणून बुकी त्यांना धमकावत होते. त्यामुळे अग्रवाल यांनी आत्महत्या केली.

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीSuicideआत्महत्या